राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 11:18 AM2018-04-21T11:18:06+5:302018-04-21T11:18:06+5:30

इंग्रजी आणि हिंदीमध्ये मजकूर पोस्ट

National Film Archive of India website hacked | राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ हॅक; बलात्काऱ्यांविरोधातील मजकूर पोस्ट

Next

नवी दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं संकेतस्थळ काल हॅक झालं होतं. बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचा संदेश हॅकर्सनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. बलात्कार प्रकरणात केल्या जाणाऱ्या राजकारणाचा निषेधही हॅकर्सकडून करण्यात आला. शुक्रवारी दुपारी काही तास हा संदेश संकेतस्थळावर दिसत होता. याबद्दलची माहिती आयटी सेलला देण्यात आली. यानंतर लगेचच हा मजकूर डिलीट करुन संकेतस्थळ पूर्ववत करण्यात आलं. 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं (एनएफएआय) संकेतस्थळ रनटाईम सोल्युशन्य या खासगी कंपनीनं तयार केलं आहे. संकेतस्थळ आकर्षक करण्यासाठी या कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली होती. काल हॅकर्सनी संकेतस्थळ हॅक करुन त्यावर इंग्रजी आणि हिंदीत मजकूर प्रसिद्ध केला. बलात्कार प्रकरणाचं राजकारण करु नका आणि या घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असा मजकूर हॅकर्सनी प्रसिद्ध केले होते. 

संकेतस्थळ हॅक करणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तींनी कोणताही डेटा चोरण्याचा प्रयत्न केला नसल्याची माहिती संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. या संकेतस्थळाचं सुरक्षा ऑडिट करण्याचं काम सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या होत्या. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचं संकेतस्थळ हॅक करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाचं संकेतस्थळदेखील हॅक करण्यात आलं होतं. 
 

Web Title: National Film Archive of India website hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.