काश्मीरच्या विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 02:24 PM2018-02-10T14:24:43+5:302018-02-10T14:24:48+5:30

नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले.

National Conference MLA Akbar Lone on shouting Pakistan Zindabad in J&K Assembly | काश्मीरच्या विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

काश्मीरच्या विधानसभेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

Next

जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत शनिवारी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजपाचे काही आमदार सभागृहात पाकिस्तानविरोधी घोषणा देत होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. साहजिकच या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. 

या घटनेनंतर अकबल लोन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याचे कबुल केले. मात्र, हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्याने इतर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले. या घटनेविषयी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अझिम मट्टू यांनी सांगितले की, लोन यांचे वक्तव्य कदापि खपवून घेण्यासारखे नाही. मी याविषयी आमच्या पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशीही बोललो. त्यामुळे आमच्या पक्षातील कोणीही अकबर लोन यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला द्विराष्ट्राचा सिद्धांत मान्य नाही, ही बाब लोन यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे होती, असे ट्विट अझिम मट्टू यांनी केले. 

Web Title: National Conference MLA Akbar Lone on shouting Pakistan Zindabad in J&K Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.