लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

By प्रेमदास राठोड | Published: May 24, 2019 05:25 AM2019-05-24T05:25:16+5:302019-05-24T05:54:52+5:30

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला.

Nathola Goodbye friends are ineffective; Backlog fills up with new friends | लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

Next

- प्रेमदास राठोड
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. पण ते मित्रपक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले. गेल्यावेळी रालोआने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यावेळी भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.
राओलाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने गेल्यावेळी ४२७ जागा लढवून २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३७ जागा लढवून स्वत:चे संख्याबळ तीनशेवर नेले. भाजपा व तेलगू देसमनंतर राओलातील सर्वांत मोठा घटकपक्ष शिवसेनेने महाराष्ट्रात गेल्यावेळी २० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी २३ जागा लढवूनही संख्याबळ मात्र जुनेच कायम राखले. भाजपाने महाराष्ट्रातील २३ हे जुने संख्याबळ कायम राखले आहे. गेल्यावेळी रालोआत राहून ३० लढविलेल्या तेलगू देसमने १६ जागा जिंकल्या होत्या. राओलाबाहेर पडल्यावर तेलगू देसमला यावेळी आंध्रात फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तेथे वायएसआर काँग्रेसने तेलगू देसमचा पार सुपडासाफ केला आहे. भाजपाला गेल्यावेळी एकसंघ आंध्र प्रदेशात ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या तेलंगणातच भाजपा ४ जागा जिंकताना दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी पक्षाला त्याची एकमेव जागाही यावेळी राखता आली नाही. याशिवाय राष्ट्रीय लोकसमता पार्टी (३), नागा पीपल्स फ्रंट (१), नॅशनल पीपल्स पार्टी (१), स्वाभिमानी पक्ष (१) यांनीही गेल्यावेळी राओलाच्या यशात खारीचा वाटा उचलला होता. आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांचा यावेळी टिकाव लागू शकला नाही.
लोक जनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, अपना दल (सोनेलाल), एन.आर. काँग्रेस, पीएमके, डीएमडीके आणि पीएनके यावेळीही रालोआसोबत होते. शिरोमणी अकाली दलाने गेल्यावेळी पंजाबातून ४ जागा रालोआच्या झोळीत टाकल्या होत्या. यावेळी १० जागा लढलेल्या शिरोमणी अकाली दलाला फक्त दोनच जागांवर यश मिळताना दिसत आहे. बिहारात जेडीयूला सोबत घेणे रालोआला लाभदायक ठरले. आसामात आसाम गण परिषदेशी दोस्ती भाजपाला फायद्याची ठरली. भाजपाने येथील स्वत:चे संख्याबळ ७ वरून ९ वर पोहोचवले आहे. मात्र, अण्णाद्रमुकला रालोआत घेऊन तामीळनाडूत २० जागा सोडणे तेवढे फायदेशीर ठरले नाही. कारण रालोआच्या संख्याबळात हा घटकपक्ष जेमतेम एक-दोन जागांची भर घालताना दिसत आहे. दुरावलेले मित्रपक्ष रालोआचा खेळ बिघडवण्याऐवजी स्वत:चाच खेळ बिघडवून बसले, असे रालोआच्या या निवडणुकीतील एकूण कामगिरीवरून दिसते.

Web Title: Nathola Goodbye friends are ineffective; Backlog fills up with new friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.