भाजपा प्रवेशासाठी पाटीदार नेत्याला 1 कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल यांनी पुरावा म्हणून जारी केली ऑडिओ क्लिप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 11:49 AM2017-10-27T11:49:50+5:302017-10-27T11:55:59+5:30

गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप 22 ऑक्टोबरला केला होता. या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून नरेंद्र पाटील यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील जारी केली आहे.

narendra patel presents audio clip as proof on bjp offer | भाजपा प्रवेशासाठी पाटीदार नेत्याला 1 कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल यांनी पुरावा म्हणून जारी केली ऑडिओ क्लिप

भाजपा प्रवेशासाठी पाटीदार नेत्याला 1 कोटींची ऑफर : नरेंद्र पटेल यांनी पुरावा म्हणून जारी केली ऑडिओ क्लिप

Next

अहमदाबाद - गुजरातमधील पाटीदार आंदोलनातील नेते नरेंद्र पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक आरोप  22 ऑक्टोबरला केला होता. या पार्श्वभूमीवर पुरावा म्हणून नरेंद्र पटेल यांनी एक ऑडिओ क्लिपदेखील जारी केली आहे. या क्लिपमध्ये भाजपा प्रवेशासाठीच्या 1 कोटी रुपयांच्या ऑफरसंदर्भात बोलणी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'एनडी टीव्ही'नं यासंदर्भातील वृत्त दिले आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची विश्वासार्हतेला अद्यापपर्यंत अधिकृत स्वरुपात दुजोरा मिळालेला नाही, असेही एनडी टीव्हीनं स्पष्ट केले आहे. 

काय आहे नेमकी घटना ?
विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागली असतानाच गुजरातेत घोडाबाजार आणि नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रलोभने देण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. मात्र याचा भाजपाला चांगलाच फटका बसत आहे. आपल्याला भाजपात येण्यासाठी एक कोटीची ऑफर दिल्याचा आरोप पटेल समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला. पत्रकार परिषद घेत त्यांनी हा आरोप केला होता. 
नरेंद्र पटेल यांनी मला भाजपामध्ये प्रवेशासाठी १ कोटी रुपयांची आॅफर दिली होती आणि त्यापैकी १0 लाख रुपये रोख दिले होते, असे सांगताना ती रक्कमच पत्रकार परिषदेत सादर केली होती. उरलेले ९0 लाख सोमवारी देण्याचे मान्य करण्यात आले होते, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होते. यावरून भाजपाचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. राहुल गांधी यांनीही गांधीनगरच्या सभेत ‘गुजरातचा आवाज’ विकत घेतला जाऊ शकत नसल्याचा टोला भाजपाला लगावला होता.

निखिल सवानी यांचीही भाजपाला सोडचिठ्ठी
दरम्यान, 23 ऑक्टोबरला निखिल सवानी या पटेल समाजाच्या नेत्याने भाजपा सोडणार असल्याचे जाहीर करून भाजपाला झटका जोरदार झटका दिला होता. आणखी दोन नेतेही काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सवानी यांनी आपण भाजपामधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, नरेंद्र पटेल व सवानी हे दोघे हार्दिक पटेल यांचे समर्थक आहेत. काही दिवसांपूर्वीच सवानी भाजपामध्ये गेले होते. आपण नरेंद्र पटेल यांचे अभिनंदन करतो, असे सांगून सवानी म्हणाले की, एका गरीब कुटुंबातून आले असतानाही पटेल यांनी भाजपाची एक कोटीची ऑफर नाकारली, ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आपणास भाजपाने कोणतीही पैशांची ऑफर दिली नव्हती, हे स्पष्ट करतानाच ते म्हणाले की, आपणास केवळ आश्वासनांचा लॉलिपॉप भाजपाने दाखवला. मात्र पटेल समाजाच्या नेत्यांना फोडण्यासाठी भाजपाकडून पैशांची ऑफर दिली जात असल्याचे आपण ऐकून आहोत, असे यावेळी त्यांनी म्हटले होते.

Web Title: narendra patel presents audio clip as proof on bjp offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.