नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 03:50 PM2019-02-11T15:50:47+5:302019-02-11T15:59:22+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. असा आरोप केजरीवाल यांनी केला.  

Narendra Modi's behavior with opposition CM like Pakistan's Prime Minister | नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका 

नरेंद्र मोदींचे वर्तन पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे, अरविंद केजरीवाल यांची टीका 

Next
ठळक मुद्देदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनी चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले.

नवी दिल्ली  - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले. यावेळी नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक नेते पोहेचले. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला.  

केजरीवाल म्हणाले, ''जेव्हा  कुणी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो केवळा एका पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर तो संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा पंतप्रधान बनता तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असता. मात्र ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देतात त्यावरून ते भारतातचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान वाटतात. 


 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांना विरोधाचा सामना करावा लागला होता. काही ठिकाणी त्यांच्याविरोधात मोठे बॅनरही लावण्यात आले होते. आज चंद्राबाबू नायडू यांनी पुकारलेल्या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, शरद यादव यांनी पाठिंबा दिला होता. 
 

Web Title: Narendra Modi's behavior with opposition CM like Pakistan's Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.