संयुक्त राष्ट्राकडून भारताचा सन्मान, नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 09:36 AM2018-09-27T09:36:46+5:302018-09-27T09:39:45+5:30

चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांना पर्यावरणासाठी

Narendra Modi gets the 'Champion of the Earth' award, honor from the United Nations | संयुक्त राष्ट्राकडून भारताचा सन्मान, नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराचा मान

संयुक्त राष्ट्राकडून भारताचा सन्मान, नरेंद्र मोदींना 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराचा मान

Next

दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. पॉलिसी लिडरशीप या कॅटेगिरीतून मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींसह फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल सोलर अलायंस आणि पर्यावरण क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.

'चॅम्पियन ऑफ द अर्थ' हा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठा सन्मान आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मँक्रो यांना पर्यावरणासाठी वैश्विक करार करण्यासाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना, 2022 पर्यंत प्लॉस्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याची शपथ घेतल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. 



केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. सस्टेनेबल एनर्जी (नवीकरणीय ऊर्जा) क्षेत्रातील गतीमानतेसाठी दूरदृष्टि दाखविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. कारण, कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णत: सौरउर्जेवर कामकाज करणारे विमानतळ आहे. 
 

Web Title: Narendra Modi gets the 'Champion of the Earth' award, honor from the United Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.