Padmaavat Controversy : भन्साळींच्या आईवर 'लीला की लीला' नावाचा सिनेमा बनवून करणी सेना घेणार सूड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 03:38 PM2018-01-26T15:38:10+5:302018-01-26T16:36:29+5:30

संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व वादग्रस्त पद्मावत सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकला.

with the name of leela ki leela karni sena will make a film on bhansali mother | Padmaavat Controversy : भन्साळींच्या आईवर 'लीला की लीला' नावाचा सिनेमा बनवून करणी सेना घेणार सूड

Padmaavat Controversy : भन्साळींच्या आईवर 'लीला की लीला' नावाचा सिनेमा बनवून करणी सेना घेणार सूड

Next

नवी दिल्ली -  संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व वादग्रस्त 'पद्मावत' सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर झळकला. पद्मावत सिनेमाला करणी सेनेनं तीव्र विरोध दर्शवत देशभरात हिंसक आंदोलनं केली. सिनेमाच्या प्रदर्शनात अडचणी निर्माण करण्यासाठी करणी सेनेनं अनेक कारनामे केले, मात्र बॉक्सऑफिसवर पद्मावत रिलीज होण्यापासून रोखण्यात करणी सेना अपयशच आले. आता भन्साळी यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी करणी सेना दुस-या मार्गाचा वापर करण्याची योजना आखत आहेत.
''आम्ही आता संजय लीला भन्साळी यांच्या आईवर सिनेमा बनवणार आहोत आणि 'लीला की लीला' असे त्या सिनेमाचं नाव असेल'', असे करणी सेनेनं सांगितले आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, चित्तोडगड येथे राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष गोविंद सिंह खंगरोत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदमध्ये  भन्साळी यांच्या आईवर सिनेमा बनवणार असल्याचं त्यांनी सांगितले. 'लीला की लीला' नाव असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन अरविंद व्यास करतील.  

15 दिवसांच्या आत शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. भन्साळी यांनी पद्मावत बनवून माँ पद्मिनीच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवले आहे आणि याचं प्रत्युत्तर म्हणून करणी सेना लीला की लीला सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा सिनेमा पाहून भन्साळींना अभिमान वाटेल, असा टोलादेखील त्यांनी हाणला आहे. ''जर देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे तर आम्हीदेखील असेच काही तरी करू इच्छित आहोत'', असंही त्यांनी सांगितले.

चार हजार थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित

उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ सिनेमा गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील सिनेमागृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा सिनेमा पहिल्या दिवशी चार हजार सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आणि १0 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. या सिनेमाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

न्यायालयाचा अवमान-
पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अ‍ॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर २९ जानेवारीला सुनावणी आहे.

Web Title: with the name of leela ki leela karni sena will make a film on bhansali mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.