देशाच्या मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:04 AM2019-03-15T06:04:47+5:302019-03-15T06:05:07+5:30

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील निम्म्या महिला मतदारांची नावे अदृश्य झाली आहेत

Name of 20 million women missing from voter list of country | देशाच्या मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब

देशाच्या मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब

Next

नवी दिल्ली : निवडणुका जाहीर झाल्या असतानाच, मतदार याद्यांतून २ कोटी १० लाख महिलांची नावे गायब असल्याची माहिती उजेडात आली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील निम्म्या महिला मतदारांची नावे अदृश्य झाली आहेत.

प्रख्यात पत्रकार प्रणव रॉय तसेच दोराब सोपारीवाला यांच्या ‘द व्हर्डिक्ट : डिकोडिंग इंडियाज इलेक्शन्स’ पुस्तकात ही माहिती आहे. मतदार याद्यांतून महिलांची नावे गायब होण्याचे प्रमाण आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये कमी आहे. प्रत्येक मतदारसंघातील सरासरी ३८ हजार महिलांची नावे यादीत नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण प्रत्येक मतदारसंघात ८० हजारांपर्यंत जाते.

Web Title: Name of 20 million women missing from voter list of country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.