हैदराबादमधील एकदम फिल्मी स्टोरी, 'मटण सूप'ने केला हत्येचा उलगडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 01:48 PM2017-12-13T13:48:22+5:302017-12-13T13:51:47+5:30

एका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहे. हैदराबादमधील ही घटना आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे प्रकरण आहे.

Mutton Soup cracked murder case | हैदराबादमधील एकदम फिल्मी स्टोरी, 'मटण सूप'ने केला हत्येचा उलगडा 

हैदराबादमधील एकदम फिल्मी स्टोरी, 'मटण सूप'ने केला हत्येचा उलगडा 

googlenewsNext
ठळक मुद्देएका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहेएम स्वाती हिने आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केलीयानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकलं होतं

हैदराबाद - एका मटण सूपमुळे मिळालेल्या टिपच्या आधारे पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची उकल केली आहे. हैदराबादमधील ही घटना आहे. एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे प्रकरण आहे. अॅसिड हल्ल्याचा तपास करणा-या पोलिसांना मटण सूपमुळे हे एक हत्या प्रकरण असून खूप मोठा कट रचला गेल्याचं लक्षात आलं. सत्य समोर आलं तेव्हा त्यांनाही धक्काच बसला. 

काय आहे नेमकं प्रकरण 
मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये राहणा-या एम स्वाती हिने आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केली. यानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकलं. नंतर चालाखीने सर्वांना आपला पती सुधाकर रेड्डीवर अॅसिड हल्ला झाल्याचं सांगितलं. कुटुंबातील लोकांनीही स्वातीवर विश्वास ठेवत स्वातीचा प्रियकर राजेशला सुधाकर रेड्डी समजून रुग्णालयात दाखल केलं. 

मटण सूपमुळे आला संशय
राजेश रुग्णालयात दाखल असताना कुटुंबातील एका सदस्याने त्याला मटण सूप ऑफर केलं. पण राजेश शाकाहारी असल्या कारणाने त्याने सूप पिण्यास नकार दिला. यामुळेच सुधाकर रेड्डीच्या कुटुंबियांना संशय आला, कारण सुधार रेड्डीला मटण सूप प्रचंड आवडत होतं. नेमकं इथेच गणित फसलं आणि कुटंबियांचा संशय वाढला. त्यांनी पोलिसांकडे फिंगरप्रिंट टेस्ट करण्याची मागणी केली. टेस्ट केल्यानंतर त्यांचं पितळं उघड पडलं आणि पोलिसांना हत्येचा उलगडा झाला. 

आधी बेशुद्दीचं इंजेक्शन आणि नंतर हत्या
टेस्टनंतर पोलिसांना नेमका प्रकार लक्षात आला आणि त्यांनी स्वातीला अटक केली. चौकशीदरम्यान स्वातीने आपण आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली, आणि नंतर प्रियकर राजेशलाच सुधाकर म्हणून सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्याच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याची कबुली दिली.

स्वातीने सांगितलं की, 'सुधाकर रेड्डी झोपला असताना प्रियकरासोबत मिळून आधी त्याला बेशुद्दीचं इंजेक्शन दिलं, आणि नंतर लोखंडी रॉडने वार करुन हत्या केली'. प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस सलग स्वातीची चौकशी करत आहेत. तिचा प्रियकर राजेश रुग्णालयात दाखल असल्या कारणाने अद्याप त्याला अटक करण्यात आलेलं नाही. 
 

Web Title: Mutton Soup cracked murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.