एअर इंडियाचा महाप्रताप, मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला बसवले मुंबईच्या विमानात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 02:45 PM2017-12-30T14:45:24+5:302017-12-30T16:07:40+5:30

मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला मुंबईच्या विमानात बसवून एअर इंडियाने नवा गोंधळ घातला आहे. यामुळे कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

The Muscat passenger settled in the Mumbai plane, Air India's miss management | एअर इंडियाचा महाप्रताप, मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला बसवले मुंबईच्या विमानात

एअर इंडियाचा महाप्रताप, मस्कतला जाणाऱ्या प्रवाशाला बसवले मुंबईच्या विमानात

Next
ठळक मुद्देएअर इंडियाचे 15 डिसेंबर रोजी दिल्ली-मुंबई एआय24 हे विमान हे उड्डाणासाठी रन-वेवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे विमानात उड्डाणपूर्व उद्घोषणा करण्यात आली.एअर इंडियाने आपल्याला चुकीच्या विमानात बसवल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले आणि त्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले

नवी दिल्ली- कदाचित चुकीच्या बसमध्ये चढण्याचा किंवा घाई-गडबडीत चुकीच्या लोकल किंवा रेल्वेत प्रवासी बसण्याने झालेल्या गोंधळाच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, तसा एखादा अनुभवही प्रत्येकाला असतो. मात्र एअर इंडियाने यासर्वांच्या पुढे जात मस्कतला जाणाऱ्या एका प्रवाशाला चक्क मुंबईला जाणाऱ्या विमानात बसवून भोंगळ कारभाराचे नवे उदाहरण प्रस्थापित केेले आहे. विमानात बसल्यावर हे विमान मुंबईला जाण्यासाठी उड्डाण करणार आहे अशी उदघोषणा झाल्यावर मात्र हा गोंधळ प्रवाशाच्या लक्षात आला आणि त्याने लगेचच ही बाब विमानाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.  त्यानंतर त्याला सोडण्यासाठी विमान पुन्हा टर्मिनलला नेण्यात आले. 15 डिसेंबरला घडलेल्या या घटनेची माहिती उघड झाली आहे.

या गोंधळानंतर एअर इंडियाने दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्या प्रवाशाच्या सुदैवाने मस्कतला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण एक तास उशिरा होणार होते. त्यामुळे त्याला मुंबईच्या विमानातून उतरून त्या विमानात जाता आले. अन्यथा तो मस्कत प्रवासाला मुकला असता.

"एअर इंडियाचे 15 डिसेंबर रोजी दिल्ली-मुंबई एआय24 हे विमान हे उड्डाणासाठी रन-वेवर आल्यानंतर नेहमीप्रमाणे विमानात उड्डाणपूर्व उद्घोषणा करण्यात आली. त्यावेळेस एअर इंडियाने आपल्याला चुकीच्या विमानात बसवल्याचे प्रवाशाच्या लक्षात आले आणि त्याने कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिले, त्यानंतर त्याला एअर इंडियाच्या एआय 973 या मस्कतला जाणाऱ्या विमानात बसविण्यात आले," असे एअर इंडियाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले. प्राथमिक तपासामध्ये डिपार्चर गेटजवळचे बोर्डिंग कार्ड स्कॅनर योग्यप्रकारे काम करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बोर्डिंग पासची तपासणी कर्मचाऱ्यांकडू केली जात होती. व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पासवर बारकोड होते आणि त्याच दिवशी स्कॅनर बंद होता. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने असा प्रकार घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचेही सांगितले.

Web Title: The Muscat passenger settled in the Mumbai plane, Air India's miss management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.