Mukesh Ambani-Sarves | 20 दिवस अख्खा देश पोसू शकतील मुकेश अंबानी- सर्व्हे

नवी दिल्ली- जर एखाद्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीवर देशाला चालवण्याची वेळ आल्यास तो त्यांच्या संपत्तीवर किती दिवस देश चालवू शकतो ?, या प्रश्नाचं उत्तर ब्लूमबर्गनं रॉबिनहुड इंडेक्समधून दिलं आहे. या यादीत 49 देशांचा समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीचाही हवाला देण्यात आला आहे.

यादीनुसार भारतात सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी 4.3 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह 20 दिवस सरकार चालवू शकतात. विशेष म्हणजे देश चालवण्याच्या बाबतीत भारत हा अमेरिका आणि चीनच्या पुढे राहू शकतो, असंही या यादीतून स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे चीनमधील सर्वाधिक श्रीमंत असलेले जॅक मांच्या संपत्तीवर चीनचा जेमतेम चार दिवस कारभार हाकू शकतो. तर अमेरिकेतील सर्वात धनाढ्य व्यक्ती जेफ बेजॉस यांच्या संपत्तीवर अमेरिकेचा 5 दिवस देश चालवू शकतो. या यादीत अंगोला, ऑस्ट्रेलिया, चिली आणि नेदरलँड्समधल्या चार महिलांचाही समावेश करण्यात आला आहे.

यादीमध्ये सायप्रससारख्या लहान देशाचंही नाव आहे. सायप्रसमधील श्रीमंत व्यक्ती जॉन फ्रेड्रिक्सन हे 10 अब्ज डॉलरच्या संपत्तीतून जवळपास वर्षभर देशाचा कार्यभार हाकू शकतात. रॉबिनहुड इंडेक्सच्या यादीमध्ये जवळपास 49 देशांना समाविष्ट करण्यात आले असून, देशांचा कारभार हाकण्यासाठी लागणारा दररोजचा खर्च आणि त्या देशातील धनाढ्य व्यक्तीची एकूण संपत्तीची माहिती देण्यात आली आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.