मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जनं केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 04:24 PM2017-10-05T16:24:25+5:302017-10-05T16:26:42+5:30

फोर्ब्ज मॅगझिननं भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

Mukesh Ambani is the richest person in India, proclaimed by Forbesan | मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जनं केलं जाहीर

मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जनं केलं जाहीर

Next

नवी दिल्ली - फोर्ब्ज मॅगझिननं भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. फोर्ब्जनं भारतातल्या 100 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केलीय. या यादीमध्ये दुस-या क्रमांकावर अझीम प्रेमजी, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत.

मुकेश अंबानी 38 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर झेपावले आहेत, तर अझीम प्रेमजी 19 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुस-या स्थानी आहे. हिंदुजा बंधू यांची 18.4 अब्ज डॉलरची संपत्ती असल्यानं त्यांना यादीत तिसरं स्थान बहाल करण्यात आलं आहे. तर लक्ष्मी मित्तल हे 16.5 अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानी विराजमान झाले आहेत. पालोनजी मिस्त्री 16 अब्ज डॉलर, तर गोदरेज कुटुंबीय 14.2 अब्ज डॉलरसह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत, शिव नाडर हे 13.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सातव्या स्थानी आहेत. कुमार बिर्ला 12.6 अब्ज डॉलर, दिलीप संघवी 12.1 अब्ज डॉलर, गौतम अदानी 11 अब्ज डॉलरसह आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करून, केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपविण्यात यश आलेले नाही, असेच फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्पष्ट झाले होते. या मासिकातील वृत्तानुसार भारतात आजही प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि अन्य शेजारी राष्ट्रांपेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत खूपच पुढे असल्याचंही फोर्ब्जनं समोर आणून दिलं होतं.

या मासिकाने भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे म्हटले होते. ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे फोर्ब्जने हा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशपेक्षाही भारतात अधिक भ्रष्टाचार आहे, असे अहवालातून स्पष्ट झालं आहे. भारतामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते.
आशिया खंडामध्ये भ्रष्टाचाराची समस्या खूपच भयानक असून, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, म्यानमार व भारत या पाच देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूपच अधिक आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणाच्या आधारे काढण्यात आला आहे. या पाच भ्रष्ट देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला असून, त्या खालोखाल व्हिएतनाम (६५ टक्के), थायलंड व पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो, असे या अहवालातून दिसते.

पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा २0 टक्के कमी म्हणजेच, ४० टक्के आहे, असे हा अहवाल म्हणतो. सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकणार नाही, पण त्यांची ‘न खाने दूंगा’ ही घोषणा मात्र प्रत्यक्षात आलेली नाही, असेच अहवालातील निष्कर्षांमुळे म्हणावे लागेल. प्रशासनातील, तसेच राजकारणातील भ्रष्टाचार आजही संपलेला नाही वा कमी झालेला नाही, असाच याचा अर्थ आहे. हा सर्व्हे तब्बल १८ महिने सुरू होता. त्यात आशिया खंडातील १६ देशांमधील विविध विभागांत राहणा-या लोकांना प्रश्न विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात चालविलेल्या प्रयत्नांबद्दल ५३ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Mukesh Ambani is the richest person in India, proclaimed by Forbesan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.