रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 08:44 AM2018-08-30T08:44:38+5:302018-08-30T08:57:58+5:30

प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे.

mouse bite Passenger, Consumer court ordered imposed fine to railway | रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश 

रेल्वेत प्रवाशाला चावला उंदीर, कोर्टाने दिले नुकसान भरपाईचे आदेश 

Next

सालेम (तामिळनाडू) - रेल्वे प्रवासादरम्यान होणारा झुरळ, उंदीर यांचा त्रास भारतीय प्रवाशांसाठी काही नवा नाही. प्रवासादरम्यान झुरळ उंदरांनी त्रस्त केल्याचा अनुभव तुम्हीही घेतला असेलच. अशीच एक घटना समोर आली आहे. रेल्वेत प्रवास करत असताना एका प्रवाशाचा उंदराने चावा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशाने थेट ग्राहक मंचाकडे दाद मागितली. ग्राहक मंचानेही या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत रेल्वेला 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. 

ही घटना तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील असून, येथील वेंकटचलम हे गृहस्थ 8 ऑगस्ट रोजी रेल्वेने चेन्नईला जात होते. प्रवासादरम्यान रेल्वेच्या डब्यात असलेल्या उंदराने त्यांचा चावा घेतला. त्यांनी याची तक्रार रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर त्यांनी रेल्वेच्या ग्राहक मंचाकडे दाद मागितली. वेंकटचलम यांच्या याचिकेवर ग्राहक मंचात सुनावणी झाली. त्यासुनावणीवेळी ग्राहक मंचाने वेंकटचलम यांना 25 हजार रुपये नुकसान भरपाई आणि  दोन हजार रुपये उपचार खर्च देण्याचे आदेश रेल्वेला दिले.  

जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष आर. व्ही. दीनदयाळन आणि सदस्य एस. राजलक्ष्मी यांनी मानसिक त्रासासाठी प्रवासी वेंकटचलम यांना ही भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच पीडित प्रवाशाला न्यायालयीन खर्चासाठी पाच हजार रुपये अतिरिक्त देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  

Web Title: mouse bite Passenger, Consumer court ordered imposed fine to railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.