टीव्ही, फ्रीजसह ८८हून अधिक वस्तू स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:40 AM2018-07-22T03:40:30+5:302018-07-22T03:41:13+5:30

जीएसटी कौन्सिलचा दिलासा; सॅनिटरी पॅड पूर्णपणे करमुक्त

More than 88 items cheaper with TV, freeze | टीव्ही, फ्रीजसह ८८हून अधिक वस्तू स्वस्त

टीव्ही, फ्रीजसह ८८हून अधिक वस्तू स्वस्त

googlenewsNext

नवी दिल्ली : सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून सूट देण्याच्या एक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच ८८ वस्तूंवरील कराचे दर कमी करण्यात आले आहेत. यात टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, विजेवर चालणारे घरगुती उपकरणे आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे.
यापुढे वर्षाला ५ कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक तिमाही रिटर्न दाखल करू शकतात. तिमाही रिटर्नही मासिक रिटर्नसारखाच भरावा लागणार आहे. परिषदेने रिव्हर्स चार्ज व्यवस्थेवरील अंमलबजावणी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत स्थगित केली आहे. परिषदेने सेवा क्षेत्रातील सुविधेसाठी काही निर्णय घेतले आहेत. हॉटेलच्या रूमवरचा जीएसटी आता घोषित भाड्याऐवजी वास्तविक घेतल्या जाणाऱ्या भाड्यावर लागेल. सध्या ७५०० रुपयांपेक्षा अधिकच्या रूमवर २८ टक्के व २५०० ते ७५०० रुपयांच्या रूमवर १८ टक्के तर, १००० ते २५०० रुपयांच्या रूमवर १२ टक्के कर आकारण्यात येतो.

या वस्तूंना वगळले
सॅनिटरी नॅपकीन व्यतिरिक्त राखी, हस्तकला, स्टोन, मार्बल, लाकडी मूर्ती, फूलझाडू, सालपत्ते आदी वस्तूंवर यापुढे कोणताही
कर लागणार नाही. हस्तकलेद्वारे निर्मित छोट्या वस्तूही करातून पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत.

२८% ऐवजी १८% कर
टीव्ही (२७ इंचांपर्यंत), वॉशिंग मशीन, फ्रिज, व्हिडिओ गेम्स, लिथियम आयर्न बॅटरी, व्हॅक्युम क्लीनर्स, फूड ग्राइंडर्स, मिक्सर, स्टोरेज वॉटर हिटर, ड्रायर, रंग, वॉटर कूलर्स, मिल्क कूलर्स, आइस्कीम कूलर, परफ्यूम, टॉयलेट स्प्रे आदी वस्तूंवर आजवर २८ टक्के इतका जीएसटी लावला जात होता. तो आता १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

१८% ऐवजी १२% कर
हॅण्डबॅग, दागिन्यांचे बॉक्स, पेटिंगचे लाकडी बॉक्स, आर्टवेअर ग्लास, हातांनी बनवलेले लॅम्प आदी वस्तूंवरील कर घटवून १२ टक्के केला आहे. बांबूच्या वस्तूंवरही १२ टक्के इतकाच कर आकारला जाईल.

५% कर : जीएसटी कौन्सिलने इथेनॉलवर असलेल्या १८ टक्के करात मोठी कपात करत आता तो ५ टक्क्यांवर आणला आहे. याचा चीनी उद्योग आणि शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त, १००० रुपयांपर्यंतची पादत्राणे आणि बुटांवरही ५ टक्के इतका कर आकारला जाईल.

Web Title: More than 88 items cheaper with TV, freeze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.