देशात आणखी २५ हजार आधार केंद्रे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:08 AM2018-02-20T03:08:38+5:302018-02-20T03:08:49+5:30

सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे

More than 25,000 base stations will be started in the country | देशात आणखी २५ हजार आधार केंद्रे सुरू होणार

देशात आणखी २५ हजार आधार केंद्रे सुरू होणार

Next

संतोष ठाकूर
नवी दिल्ली : सर्व सेवा मिळण्यासाठी आधार अनिवार्य केले जात असतानाच दुसरीकडे आधार केंद्रे बंद होत आहेत. यामुळे सरकारने सहा ते नऊ महिन्यांत २५ ते ३५ हजार आधार केंद्रे सुरू करण्याचे ठरवले आहे. यातील बहुतेक केंद्रे ही टपाल कार्यालये वा बँकांमध्ये असतील.
आधारच्या अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार बँकांमध्ये आधार अनिवार्य आहे. आम्ही बँकांना कळवले आहे की तुम्ही ग्राहकांना आधार मागत असाल तर त्यांना आधारची सुविधाही दिली पाहिजे. तुमच्या शाखेत आधारचे यंत्र बसवावे. ज्या ग्राहकांकडे/खातेदारांकडे आधार नाही वा त्यांच्या नावात काही विसंगती आहे, तर ती दुरुस्ती बँकांनीच करून घ्यावी.
टपाल कार्यालयातही आधार केंद्रे सुरू होणार आहेत. जे बँकेत जाऊ शकत नाहीत, त्यांना जवळच्या टपाल कार्यालयातून आधार क्रमांक मिळवता येईल व विसंगतीही दुरुस्त करून घेता येईल.
जवळपास १५ हजार बँक शाखा व सुमारे १६-१८ हजार टपाल कार्यालयांमध्ये ही केंद्रे सुरू करण्याचे आधार प्राधिकरणाचे लक्ष्य आहे. टपाल कार्यालये व बँकांनी म्हटले आहे की, त्यासाठी वेगळा कर्मचारीवर्ग आधारचे यंत्र व वेगळी जागाही तयार करावी लागेल. हा खर्च कोण करणार, हा प्रश्न आहे.

यावर आधारच्या अधिकाºयाने सांगितले की, ज्या खासगी कंपन्यांना याआधी आधार केंद्र चालवण्याची परवानगी दिली गेली होती त्यातील स्टार रँकिंगच्या लोकांना ते जागा देऊ शकतात. बँक व टपाल कार्यालयाने आधारचे यंत्र एकदा घेतले की ते कायमस्वरूपी त्यांच्या कामाला येईल. ते त्यांनी विकत घ्यावे.

Web Title: More than 25,000 base stations will be started in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.