परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 02:58 PM2018-04-20T14:58:46+5:302018-04-20T14:58:46+5:30

देशामध्ये सध्या लहान मुली, महिला, तरुणींवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताहेत.

moradabad BA student gang raped thakurdwara when she was returning home | परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BAच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार 

लखनौ - देशामध्ये सध्या लहान मुली, महिला, तरुणींवरील होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढताहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडित तरुणी BA द्वितीय वर्षांमध्ये शिकत होती. परीक्षा देऊन घराकडे परतत असताना काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. उन्नाव सामूहिक बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात 6 बलात्काराच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  काही दिवसांपूर्वी इहाट येथे एका 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील स्थानिकांनी संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थितीदेखील निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी वरात पाहायला गेलेल्या चिमुकलीचा बलात्कार करण्यात आला होता.

स्वत:ची मुलगी दिली मित्रांना बक्षीस
तर दुसरीकडे,  उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका बापानेच ३५ वर्षांची विवाहित मुलगी आपल्या मित्रांना बक्षीस म्हणून दिली आणि त्यांच्याबरोबरच स्वत:च्या मुलीवर बलात्कार केला, असे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र तो बाप अद्याप फरार आहे. सीतापूरहून जवळच असलेल्या कमालपूर नावाच्या गावात जत्रा होती. तिथे हा बाप १५ एप्रिल रोजी मुलीला घेऊन गेला. तिथे त्याने मानसिंह नावाच्या गुन्हेगार मित्राला बोलावून घेतले. सारे फिरायला जाऊ, असे सांगून मुलीला मानसिंहच्या बाइकवर बसायला सांगितले. तेथून मानसिंह तिच्यासह मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. तिथे त्याने व त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिथे पोहोचलेल्या बापानेही मुलीवर बलात्कार केला.

नंतर या महिलेला मेराजच्या घरी १८ तास कोंडून ठेवण्यात आले. तिची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यानंतर घरी येऊ न तिने हा सारा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच महिलेचा बाप, मानसिंह, मेराज आणि इतरांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मेराजला व अन्य दोघांना लगेच अटक करण्यात आली. 
 

Web Title: moradabad BA student gang raped thakurdwara when she was returning home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.