Modiji, take a letter now! Shatrughan Sinha's advice | मोदीजी, आता तरी पत्रपरिषद घ्या!; शत्रुघ्न सिन्हा यांचा सल्ला
मोदीजी, आता तरी पत्रपरिषद घ्या!; शत्रुघ्न सिन्हा यांचा सल्ला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता तरी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रश्नांचा सामना करावा, असा सल्लावजा टोला भाजपाचे बंडखोर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी लगावला आहे.

मोदी यांनी एक स्वतंत्र आणि निष्पक्ष पत्रकार परिषद घ्यावी, ती बनावट नसावी. केवळ दरबारातील पत्रकार या परिषदेला उपस्थित नसावेत, अशी विनंतीही सिन्हा यांनी केली. पत्रकार परिषद न घेतल्यास भारतीय लोकशाहीच्या इतिहासात मोदीजी, तुम्ही पंतप्रधान म्हणून तुम्ही सर्वात खाली जाल, असेही सिन्हा यांनी नमूद केले. सरकार बदलण्यापूर्वी एनडीएने सर्व घटकपक्षांसह माध्यमांना सामोरे जावे, असेही सिन्हा यांनी म्हटले.


Web Title: Modiji, take a letter now! Shatrughan Sinha's advice
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.