मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 07:46 PM2019-02-05T19:46:26+5:302019-02-05T21:03:50+5:30

ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधातील कारवाईविरोधात रविवारी रात्री धरणे आंदोलन छेडले होते.

Modi should resign and go to Gujarat; Mamta Banerjee protest end | मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे

मोदींनी राजीनामा देऊन गुजरातमध्ये जावे; ममता बॅनर्जी यांचे आंदोलन मागे

googlenewsNext

कोलकाता : पोलिस आयुक्तांच्या घरावर दोन दिवसांपूर्वी धाड टाकण्यास गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतरचा प. बंगालमधील हायव्होल्टेज ड्रामा आज सायंकाळी संपला आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर धरणे आंदोलन थांबविले आहे. मात्र, पुढील आठवड्यात 13 आणि 14 फेब्रुवारीला दिल्लीत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ममता यांनी दिला.


ममता बॅनर्जी यांनी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्याविरोधातील कारवाईविरोधात रविवारी रात्री धरणे आंदोलन छेडले होते. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राजीव कुमार यांना सीबीआय अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. शिलाँगच्या सीबीआय कार्यालयामध्ये कुमार हजर राहणार आहेत. 




आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मंगवारी सायंकाळी ममता बॅनर्जींची भेट घेतली. यावेळी ममता यांनी सांगितले की, केंद्र सरकार राज्यांच्या यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा आणि गुजरातला परतावे. हे सरकार एक व्यक्ती आणि एका पक्षाची सरकार आहे, असा आरोप केला. 

Web Title: Modi should resign and go to Gujarat; Mamta Banerjee protest end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.