'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 09:43 AM2019-04-05T09:43:05+5:302019-04-05T09:52:33+5:30

'मोदी सध्या भारताबाबत नाही, तर फक्त पाकिस्तानबद्दल आणि तेथील लोकांबाबत बोलत आहेत,' असे विधान कपिल सिब्बल यांनी केले आहे. तसेच मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची विनम्रता खालावली आहे, असा आरोपही सिब्बल यांनी केला. 

Modi has diminished status of PM's office: Kapil Sibal | 'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या'

'मोदीजी, आता सर्जिकल स्ट्राईकमधून बाहेर पडा अन् बेरोजगारीकडे लक्ष द्या'

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.'मोदी सध्या भारताबाबत नाही, तर फक्त पाकिस्तानबद्दल आणि तेथील लोकांबाबत बोलत आहेत,' असे विधान कपिल सिब्बल यांनी केले आहे.मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची विनम्रता खालावली आहे, असा आरोपही सिब्बल यांनी केला. 

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असतानाच नेतेमंडळींमधील वाकयुद्धही जोर धरू लागले आहे. आपल्या विरोधातील नेत्यांविरोधात टीका करताना सर्वपक्षीय नेत्यांकडून आक्षेपार्ह टीकाटिप्पणीसुद्धा केली जाऊ लागली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'मोदी सध्या भारताबाबत नाही, तर फक्त पाकिस्तानबद्दल आणि तेथील लोकांबाबत बोलत आहेत,' असे विधान कपिल सिब्बल यांनी केले आहे. तसेच मोदींच्या विधानांनी पंतप्रधानपदाची विनम्रता खालावली आहे, असा आरोपही सिब्बल यांनी केला. 

'सर्जिकल स्ट्राइक'मधून बाहेर पडून त्यांनी आता बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे, असा सल्लाही सिब्बल यांनी मोदींना दिला आहे. कपिल सिब्बल यांनी 'मोदींपूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने अशी भूमिका घेतली नव्हती. मोदी सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करण्यास तयार आहे; पण गरिबांसाठी पैसे खर्च करायला तयार नाही,' असं म्हटलं आहे. भ्रष्टाचार रोखण्याबाबत मोदी यांनी केलेल्या आश्वासनांबाबतही सिब्बल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच 'देश लुबाडून नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी देशाबाहेर पळ काढला. असा चौकीदार आपल्याला खरंच हवा आहे का?' असं 'ऑपरेशन लोटस'चा उल्लेख करून सिब्बल यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्वीच्या चहावाल्याचा विसर पडून आता राजकीय लाभासाठी चौकीदाराबद्दल प्रेमाचे भरते आले आहे, अशी टीका केली होती. ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेचा खरपूस समाचार घेताना सिब्बल म्हणाले, पूर्वी मोदींनी चहावाल्यांचा खूप उदोउदो केला होता. आता त्यांना चौकीदारांची आठवण झाली. पुढच्या वेळी त्यांना वेगळेच कोणी आठवेल. शेतकऱ्यांची हलाखी, रोजगाराची वानवा, उद्योग-धंद्यांवरील संकट, सामान्य माणसांच्या दैनंदिन समस्या या सर्व आघाड्यांवर अपयश आल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही ‘चौकीदार’ मोहीम सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

Video - एकदाही तलाक न म्हणता पत्नीला सोडलं, अजित सिंह यांची मोदींवर टीका

राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी मुस्लिम महिलांसाठी तिहेरी तलाकविरोधात कायदाही आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट (तलाक) न देताच सोडून दिले' अशी टीका अजित सिंह यांनी केली होती. बागपत येथे बुधवारी (3 एप्रिल) एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे. अजित सिंह यांनी 'पंतप्रधान मोदी खोटं बोलत नाहीत. परंतु समस्या हीच आहे की, ते आजपर्यंत कधीच खरे बोलले नाहीत. ते लहान मुलांना सतत खरं बोला, असा उपदेश करत असतात. मात्र, मोदींच्या आई-वडिलांनीच त्यांना खरे बोलायला शिकवले नाही. मोदी मुस्लिम महिलांच्या बाजूने उभे असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी तिहेरी तलाकविरोधी कायदाही मोदींनी आणला. मात्र, त्याच मोदींनी स्वत:च्या पत्नीला घटस्फोट (तलाक) न देताच सोडलं' असं म्हटलं होतं.  

नरेंद्र मोदी हे खतरनाक दहशतवादी, टीका करताना चंद्राबाबूंची जीभ घसरली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी  एका प्रचारसभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खतरनाक दहशतवाद्याची उपमा दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कट्टर दहशतवादी संबोधलं आहे. मोदींनी चंद्राबाबूंची तुलना बाहुबली चित्रपटातील भल्लालदेवशी केली होती. त्याच टीकेला उत्तर देताना चंद्राबाबूंनी मोदींची कट्टर दहशतवाद्याची तुलना केली आहे. मदनापल्ले येथे एका रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले, मोदी एक खतरनाक दहशतवादी आहेत. ते योग्य व्यक्ती नाहीत. इथे माझे अल्पसंख्याक भाऊही उपस्थित आहेत. जर तुम्ही पुन्हा मोदींना मतदान केलं, तर तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. गोध्रा कांडवेळीसुद्धा 2 हजारांहून अधिक लोकांची हत्या करण्यात आली होती. मी तेव्हाच सांगितलं होतं की, मोदी देशासाठी घातक आहेत. म्हणून मी अशी पहिली व्यक्ती होतो, ज्यांनी मोदींची साथ सोडून एनडीएला सोडचिठ्ठी दिली.

नरेंद्र मोदी म्हणजे अडाणी आणि सडकछाप माणूस, माजिद मेमन यांची टीका

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजिद मेमन यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मोदींचा उल्लेख अडाणी आणि सडकछाप माणूस असा केला होता. माजिद मेमम मोदींवर टीका करताना म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अडाणी, सडकछाप माणसासारखे बोलतात, असे मला वाटते. ते एवढ्या मोठ्या पदावर बसले आहेत, त्यांचे पद घटनात्मक पद आहे. अशा पदासाठी रस्त्यावरून पंतप्रधान निवडला जात नाही. तसेच जनता थेट पंतप्रधानाची निवड करत नाही. तर जनतेकडून निवडलेले खासदार पंतप्रधानाची निवड करतात. यावेळीसुद्धा सर्वात मोठा पक्ष पंतप्रधानाची निवड करणार आहे.'' 

 

Web Title: Modi has diminished status of PM's office: Kapil Sibal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.