पॅनकार्डमध्ये चूक राहिली आहे? दुरुस्तीसाठी हे ऑनलाइन-ऑफलाइन पर्याय वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 11:59 AM2018-07-14T11:59:46+5:302018-07-14T12:12:01+5:30

कधीकधी पॅन कार्डसाठी भरलेल्या अर्जात चूक राहून जाते किंवा अयोग्य माहिती भरली जाते. त्यामुळे पॅनकार्डवरही चुकीची माहिती येते.

Mistake in PAN Card? You can Correct Them Both Online & Offline | पॅनकार्डमध्ये चूक राहिली आहे? दुरुस्तीसाठी हे ऑनलाइन-ऑफलाइन पर्याय वापरा

पॅनकार्डमध्ये चूक राहिली आहे? दुरुस्तीसाठी हे ऑनलाइन-ऑफलाइन पर्याय वापरा

Next

मुंबई- आज रोजच्या कामांमध्ये, आयकर परतावा भरण्यासाठी किंवा अनेकवेळेस बँकेच्या व्यवहारांमध्ये, देवाणघेवाणींमध्ये आणि अगदी केवळ ओळख पटवण्यासाठीही पॅनकार्डची गरज लागते. त्यामुळे इतर अनेक ओळखपत्रांबरोबर पॅन कार्डचे महत्त्व तितकेच जास्त आहे. मात्र कधीकधी पॅन कार्डसाठी भरलेल्या अर्जात चूक राहून जाते किंवा अयोग्य माहिती भरली जाते. त्यामुळे पॅनकार्डवरही चुकीची माहिती येते. असे तुमच्याबाबतीत झाले असल्यास तुम्ही पुढील पर्यायांचा विचार करु शकता.

ऑनलाइन बदलांसाठी-
 तुम्हाला पॅनकार्डावरील चूक सुधारण्याची संधी ऑनलाइनदेखिल उपलब्ध आहे. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 'अॅप्लिकेशन टाइप' यावर क्लिक करा. तेथे गेल्यावर एक यादी मिळेल (ड्रॉप डाऊन मेन्यू). त्यातील 'चेंजेस ऑर करेक्शन इन एक्झिस्टींग पॅन कार्ड' या ओळीवर क्लिक करा.

  1.  तेथे क्लिक केल्यावर तुम्हाला संबंधित माहितीचे पेज दिसेल. त्यात तुम्हाला सर्व माहिती भरावी लागेल.
  2.  दुरुस्तीच्या विनंतीसाठी तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल आणि त्याचा इ-मेलही तुम्हाला केला जाईल.
  3.  त्यानंतर 'सबमिट स्कॅन्ड इमेजेस थ्रू इ-साईन' यावर क्लिक करुन तुम्हाला पॅन कार्डातील कोणत्या मजकुरात दुरुस्ती हवी आहे ते लिहा आणि सुयोग्य माहिती द्या.
  4.   सर्व माहिती भरल्यावर पुन्हा एकदा माहिती तपासून घ्या.
  5.  त्यानंतर 'नेक्स्ट' बटणावर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमच्या वयाचा, रहिवासाचा व ओळखपत्राचा दाखला देणारी कागदपत्रे भरावी लागतील (अपलोड करा).
  6.  तुम्ही दिलेली माहिती व कागदपत्रांवरील माहिती एकच आहे हे एकदा तपासा.
  7.   माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर पेमेंट करण्यासाठी पर्याय निवडा. जर तुमचा पत्ता भारतात असेल तर तुम्हाला 110 रुपये द्यावे लागतील आणि भारताबाहेरचा पत्ता असेल तर 1,020 रुपये द्यावे लागतील.
  8.  तुम्ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डावरुन पैसे देऊ शकता. किंवा नेट बँकिंग अथवा डिमांड ड्राफ्टचाही पर्याय तुम्हाला उपलब्ध असेल. जर तुम्ही डीडीचा पर्याय निवडलात तर तो 'NSDL-PAN' या नावाने काढावा आणि तो 'मुंबई' येथे देय असावा. 

ऑफलाइन बदलांसाठी-

  •  संकेतस्थळावरुन पॅनकार्ड माहिती बदलासाठी अर्ज डाऊनलोड करुन घ्या, त्यातील सर्व रकान्यांमध्ये माहिती भरा.
  •  एकदा माहिती भरल्यावर जवळच्या 'एनएसडीएल' केंद्रात अर्ज भरा.

काही महत्त्वाच्या बाबी-

  1.  सर्व साक्षांकित कागदपत्रे एनएसडीएल केंद्रात ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर 15 दिवसांमध्ये पोहोचली पाहिजेत.
  2.  पॅनकार्ड दुरुस्तीचा अर्ज हा मजकूरातील दुरुस्तीसह अतिरिक्त कार्ड परत करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे तुम्ही अर्जातील योग्य पर्याय निवडला आहे का हे तपासून पाहावे.
  3. माहिती देताना थोडा वेळ गेला तरी चालेल पण अर्ज योग्यप्रकारे तपासून घ्या. पुन्हा चूक होणे आणखी त्रासाचे ठरू शकते.

Web Title: Mistake in PAN Card? You can Correct Them Both Online & Offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.