The minister, who is with the BJP, said; Modi will not become the Prime Minister again | भाजप सोबत सत्तेत असलेले मंत्री म्हणाले; मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाही
भाजप सोबत सत्तेत असलेले मंत्री म्हणाले; मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाही

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान १९ रोजी होणार आहे. त्याआधीच, नेत्यांनी निकालाचे अंदाज लावणे सुरु केले आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार नाहीत, असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. पुढील पंतप्रधान अनुसूचित जातीतील असेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

मायावतींचं काम बोलतं आणि गरज पडल्यास मी त्यांना समर्थन देईन. मायावती या पंतप्रधान पदासाठीच्या प्रबळ दावेदार आहेत. असं राजभर यांनी म्हटलं आहे. मी एनडीए आणि महाआघाडी दोन्हीही सोबत नाही असेही ते म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तरी मला काहीच फरक पडणार नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला. लोकसभा निवडणुकीत ११९ खासदार अनुसूचित जातीतील असतील. त्यामुळे, नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नही असा दावा ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये ओमप्रकाश राजभर कॅबिनेट मंत्री आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून राजभर यांनी भाजपच्या विरोधातील उमेदवारांना समर्थन दिले आहे.

 


Web Title: The minister, who is with the BJP, said; Modi will not become the Prime Minister again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.