अण्णांच्या आंदोलनानंतर प्रथमच लाखो लोक जमा, किसान संसद सुरू; एकवटले शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:52 AM2017-11-21T03:52:01+5:302017-11-21T03:54:06+5:30

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.

Millions of people gathered for the first time after the Anna agitation; Farmed farmers! | अण्णांच्या आंदोलनानंतर प्रथमच लाखो लोक जमा, किसान संसद सुरू; एकवटले शेतकरी

अण्णांच्या आंदोलनानंतर प्रथमच लाखो लोक जमा, किसान संसद सुरू; एकवटले शेतकरी

Next

नवी दिल्ली : नात्यांची भाषा सारखी ना झेंड्यांचा रंग! भाषाही वेगळीच. प्रदूषण व गारठ्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तरीही देशाच्या कानाकोप-यातून आलेले शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन करीत होते.
शेतकरी आत्महत्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी, शेतमालाला भाव आदी मागण्यांसह सरकारी योजनांतील फोलपणा या शेतक-यांनी उघड केला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे बॅनर पोलीस बॅरिकेड्सलाच लावले होते.
महाराष्ट्रातील शेतकरी पहाटे ५ वाजता पोहोचले. आंबेडकर भवनात त्यांचा मुक्काम होता. तेथून ते संसद मार्गावर पोहोचले. डोक्यावर स्वाभिमानी टोपी व हातात झेंडा! दीड किलोमीटरचा हा रस्ता संसदेपासून थेट कॅनॉट प्लेसपर्यंत जातो. भव्य व्यासपीठ शेतकरी नेत्यांनी व्यापले होते. या नेत्यांच्या मधोमध होते खा. राजू शेट्टी. चहूबाजूंनी शेतकरीच शेतकरी.
>पोलिसांमधील चर्चा
‘मै अण्णा हूँ’, ‘केजरीवाल हूँ’च्या टोप्याही डोकावत होत्या. काही जण प्रसारमाध्यमांच्या कॅमेºयात येण्याचा प्रयत्न करीत होते. माइकवरून मेधा पाटकर सांगत होत्या : विकासाचे मॉडेल असा प्रचार करणाºया गुजरातमध्येच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. या वाक्याला टाळ्या मिळाल्या. लाखो शेतकºयांच्या उपस्थितीत किसान मुक्ती संसद सुरू झाली. तर पोलिसांमध्ये काही जण चर्चा करीत होते - ‘अण्णा हजारे के आंदोलन के बाद शायद पहली बार इतने लोग इकठ्ठा हुए हैं!’

Web Title: Millions of people gathered for the first time after the Anna agitation; Farmed farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.