काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 12:38 PM2017-11-14T12:38:48+5:302017-11-14T12:39:31+5:30

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे.

A militant killed in Kashmir encounter, firing in Kulgam | काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

काश्मीरच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, कुलगाममध्ये गोळीबार

Next

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीय. सुरक्षा दलाच्या जवानांना काजिगडमधल्या नौबग गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली, त्यानंतर जवानांनी गावाला चारही बाजूंनी घेराव घातला. दहशतवाद्यांनी बचावाखातर जवानांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा जवानांनीही कारवाई केली.

त्राल आणि काजिकुंडमध्येही लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या जवानांनी आजूबाजूच्या परिसरात सर्च ऑपरेशनही राबवलं आहे.



तर रविवारीसुद्धा हंदवाड्यातील हाजिनमध्ये दहशतवादी व सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. त्यात एक दहशतवाद्याचा खात्मा झाला. तो दहशतवादी लष्कर एक तोय्यबाशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दहशतवाद्यांजवळून ग्रेनेड, रायफल्स आणि पाकिस्तानी चलन जप्त करण्यात आलं होतं.

Web Title: A militant killed in Kashmir encounter, firing in Kulgam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.