'मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री', कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 12:10 PM2018-04-26T12:10:09+5:302018-04-26T12:10:09+5:30

इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडविण्याचा त्यांचा मानस आहे.

mehbooba mufti is jihadi CM, says lawyer of kathua rape accused | 'मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री', कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचं वादग्रस्त विधान

'मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री', कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचं वादग्रस्त विधान

Next

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री आहेत. आपल्या इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडविण्याचा त्यांचा मानस आहे,असं वादग्रस्त विधान जम्मू काश्मीरमधील कथुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचा खटला लढणाऱ्या वकिलांनी केलं आहे. याच वकिलांनी काही दिवसांपूर्वी गुज्जर्स आणि बकरवाल मुस्लिमांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याबाबत वक्तव्य केलं होतं. अंकुर शर्मा असं या वकिलाचं नाव आहे.

मेहबूबा मुफ्ती एक जिहादी मुख्यमंत्री आहेत. त्या गोहत्येसाठी कत्तलखाने आणि गोवंशाच्या तस्करीला कायदेशीर संरक्षण देत आहेत. जम्मू हिंदूबहूल भाग आहे. तेथे मुस्लिमांना जमिनी देऊन तेथे राहायला दिलं जातं. जम्मूची हिंदूबहूल ओळख पुसली जावी असा त्यामागील उद्देश आहे, असं अंकुश शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं.  अंकुर शर्मा हे कथुआ सामुहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी संजीरामचे वकिल आहेत. संजीराम हा या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचे क्राईम ब्रांचने म्हटलं आहे. या प्रकरणात संजीराम याचा मुलगा विशाल जंगलोटा आणि विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया यांचाही समावेश आहे.

या प्रकरणाबाबत हिंदू महासभेसहित अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत बोलणं सुरू असून हिंदू एकता मंच स्थापन करुन ते आरोपीच्या समर्थनार्थ सीबीआयच्या चौकशीची मागणी करणार असल्याचंही शर्मा यांनी म्हटलं.  फेब्रुवारीत मुफ्ती यांनी एका बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले होते की, जोपर्यंत सरकार कोणती आदिवासी, जाती-जमाती कायदा करीत नाही तोपर्यंत मुस्लीम बकरवाल समुदायाला जंगलातून हटवता येणार नाही. मुफ्ती या मुस्लीम बकरवाल समाजाला आदिवासी जमात मानतात. या आदेशामुळे बकरवाल समुदायाच्या लोकांनी जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या आहेत, असा आरोप त्यांनी मेहबूबा मुफ्ती यांच्यावर हल्लाबोल करताना केला. 


 

Web Title: mehbooba mufti is jihadi CM, says lawyer of kathua rape accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.