Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 03:58 PM2018-03-03T15:58:10+5:302018-03-03T16:54:09+5:30

राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. 

Meghalaya Election Results 2018: Congress Magistrate leaves for Meghalaya not to go, BJP's Chanakya too starts | Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

Meghalaya Election results 2018: मेघालय 'हात'चं जाऊ न देण्यासाठी काँग्रेसचे दूत रवाना, भाजपचे 'चाणक्य'ही लागले कामाला

googlenewsNext

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील तीन महत्त्वपूर्ण राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाला मोठे यश मिळाले असले तरी मेघालयात मात्र काँग्रेसने आपला किल्ला शाबूत राखला आहे. याठिकाणी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत, परंतु त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता मेघालयात सत्तेचा सोपान चढण्यासाठी आपल्या दोन चाणक्यांना कामाला लावले आहे. 

मेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगसाठी रवाना झाले. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. 

तत्पूर्वी भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. हेमंत बिश्व शर्मा हे लवकरच मेघालयमध्ये जातील, असे राम माधव यांनी सांगितले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा मणिपूर आणि गोव्यासारखी परिस्थिती ओढावणार नाही, यासाठी सर्वतोपरी काळजी घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अहमद पटेल आणि कमल नाथ आज दुपारी विद्यमान मुख्यमंत्री मुकूल संगमा यांची भेट घेणार असल्याचे कळते. 

Web Title: Meghalaya Election Results 2018: Congress Magistrate leaves for Meghalaya not to go, BJP's Chanakya too starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.