In Meghalaya, the Congress continues to leak, four more MLAs will go to BJP | मेघालयमध्ये काँग्रेसला गळती सुरूच, आणखी चार आमदार भाजपात जाणार

शिलाँग : मेघालय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसला लागलेली गळती अद्याप सुरूच आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी कॅबिनेट मंत्री ए. एल. हेक हे मंगळवारी भाजपत जाणार आहेत. हेक यांच्यासोबत आणखी तीन आमदार पक्षात अधिकृतपणे सामील
होणार आहेत, असे मेघालय भाजपचे अध्यक्ष शिबून लिंगदोह यांनी सांगितले.
गोल्फ लिंक मैैदानावर हा कार्यक्रम होईल. पक्षाचे मेघालय प्रभारी व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स, भाजपचे सरचिटणीस (ईशान्य भारताचे प्रभारी) राम माधव आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटीक अलायन्सचे निमंत्रक आणि आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्व सरमा हे त्यांचे स्वागत करतील.
भाजपमध्ये येणाºया इतर आमदारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सनबोर शुल्लाई आणि अपक्ष जस्टीन दखर आणि रॉबिनस सिंगकोन यांचा समावेश आहे. या आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
गेल्या आठवड्यात सत्ताधारी काँग्रेसमधील पाच आमदारांसह
आठ आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. हे आमदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष नॅशनल पीपल्स पार्टीत चार जानेवारी रोजी दाखल होतील.


Web Title:  In Meghalaya, the Congress continues to leak, four more MLAs will go to BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.