Women's Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 09:25 AM2018-03-08T09:25:57+5:302018-03-08T09:34:40+5:30

तंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत.

Meet the Women Behind the Apps | Women's Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप

Women's Day 2018: 'त्या' बनवतात दैनंदिन वापरासाठीची अॅप

googlenewsNext

आज जागतिक महिला दिन. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांचा गौरव नेहमी होताना आपण पाहिला आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री आज समाजात वावरताना दिसते. तंत्रज्ञानातही आज महिला मागे नाहीत. आपल्या मोबाइलमध्ये असणारे व आपल्याला रोजच्या वापरात उपयुक्त ठरणारे अॅप्लिकेशन तयार करणाऱ्याही काही माहिला आहेत ज्यांच्या कामामुळे आपण मोबाइलमधील हे अॅप्लिकेशन सहजतेने वापरतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया या महिलांबद्दल..

- हॅलो इंग्लिश: लर्न इंग्लिश
इंग्रजी भाषा ही आजच्या काळाची गरज आहे. कुठल्याही क्षेत्रात आज गेलात तर इंग्रजी भाषा बोलली जाते. म्हणून इंग्रजी समजणही तितकंच महत्त्वाचं आहे. आजही अशी अनेक लोक आहेत ज्यांना इंग्रजी नीट बोलता येत नाही तसंच समजतही नाही. म्हणून यंग इंडियाची गरज लक्षात घेता प्रन्शू पटणी यांनी इंग्रजी शिकविणार अॅप डेव्हलप केलं. कुठल्याही वयाच्या व्यक्तीला इंग्रजी भाषेतील थोडफार तरी कळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रन्शू यांनी हे अॅप डेव्हलप केलं. मोबाइलच्या माध्यमातून येत्या काळात सगळ्यांनाच इंग्रजी समजावं, असा त्यांचा मानस आहे. इंटरनेटचा फार वापर करता न येणाऱ्यांसाठीही हे अॅप महत्त्वाचं आहे. 

- ओबीनो, हेल्थ अॅण्ड वेट लॉस कोच
वजन कमी करण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. फार मेहनत करूनही वजन कमी न झाल्याने सगळेच चिंतेत असतात. विशेष म्हणजे बाळंतपणात व बाळंतपणानंतर वाढलेलं वजन घटवणं ही महिलांसमोर मोठी समस्या असते. असाच अनुभव होता ओबीनो हे अॅप डेव्हलप करणाऱ्या रितू श्रीवास्तव यांचा. पहिल्या मुलीला जन्म दिल्यावर वाढलेलं वजन घटवणं हा रितू यांच्या समोरील मोठा पेच होता. खूप मेहनत करून त्यांनी वजन तर घटवलं पण त्यानंतर ओबीनो या अॅपची निर्मिती केली. वजन कमी करण्यासाठीच्या सोप्या टीप्स देणारं हे अॅप आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या टीप्समुळे वजन घटतं हे लोकांना समजवून देणं मोठी समस्या होती. पण सगळी आव्हान सांभाळत रितू यांनी हे काम पूर्ण केलं. रितू यांनी त्यांच्या गुरू कांचन कुमार यांच्या मदतीने ओबीनो अॅप डेव्हलप केलं. 

- हॅबिटिका: गेमिफाय युअर टास्क
तुम्ही एकाच खूप मेहनत करून काम करू शकता आणि खेळूही शकता याचं उत्तम उदाहरण म्हणजे हॅबिटिका हे अॅप आहे. या अॅपमध्ये टास्क मॅनेजमेंट आहे. ज्यांना व्यक्तीमत्त्व विकासावर भर देत विविध आव्हान पेलायला आवडतात व तेही खेळाच्या माध्यमातून अशांसाठी हे अॅप आहे. सिएना सेल्सी आणि विकी हसू यांनी या अॅपची निर्मिती केलीये. या दोघांनी आपापलं स्कील वापरू हे अॅप तयार केलं आहे. 

- कॅनवा- फ्री फोटो एडिटर अॅण्ड ग्राफिक डिझाइन टूल
डिझाइन करणं किंवा ग्राफिक करणं हे प्रत्येकाला सोप जावं व अगदी सोप्या पद्धतीने ते करता यावं हा विचार करून मेलानी पेर्किन्स यांनी कॅनवाची निर्मिती केली. कॉलेजमध्ये असताना मेलानी त्यांच्या वर्गातील मुलांना सॉफ्टवेअर डिझाइन करताना पाहायच्या. त्यावेळी डिझाइन करणं, सोपं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हाच विचार करून मेलानी यांनी कॅनवा डेव्हलप केलं. कॅनवा हे अॅप लॉन्च करण्यासाठी मेलांनी यांनी आधी फ्युजन बूक व इयरबूक डिझाइन लॉन्च करून तपासणी केली व त्यानंतर कॅनवा तयार केलं. कॅनवाच्या माध्यमातून सुंदर डिझाइन, फोटो एडिटिंग सहजतेने करता येतं. 

- पिरिअड टॅकर क्लू 
काही खासगी अनुभवानंतर हा अॅपची निर्मिती झाली. डॅनिश इंटरप्रिनियर इदा टीन यांनी हे अॅप तयार केलं आहे. बर्थ कंट्रोल पिल्स इदा यांच्यासाठी फायद्याच्या ठरत नव्हत्या. म्हणूनच दैनदिनी तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी हे अॅप तयार केलं. प्रत्येक स्त्रीला तिच्या मासिक पाळीतील समस्या व इतर आरोग्याच्या समस्या डिजिटल पद्धतीने पाहता याव्यात यासाठी हे अॅप तयार झालं. 

- किचर स्टोरीज- रेसिपी, बेकिंग, हेल्थी कुकिंग
स्वयंपाक करणं ही एक कला आहे. म्हणून ती कला प्रत्येकाला जोपासला यावी यासाठी तयार झालेलं हे अॅप आहे. ज्यांना स्वयंपाक येत नाही अशांना व्हिडीओ व फोटोच्या माध्यमातून शिकता यावं, यासाठी हे अॅप तयार झालं. सोशल मीडियावर आधी चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ व फोटो नसल्याने ती संधी साधत मेंटिंग गो आणि वेरेना हुबर्ट्ज या दोघींनी कुकिंग स्पेशल अॅप तयार केलं. 

- सिंपल हॅबिट मेडिटेशन
आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी काही मिनिटांचा वेळ देणं कठीण आहे. रोजच्या कामाशिवाय काही जणांच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यामुळे ती व्यक्ती त्या घटनेच्या विचारात असते. त्या घटनेच्या मानसिक त्रासाला सामोरी जाते. युन्हा किम या महिलेने या अॅपची निर्मिती केली. व्यवसाय करण्याच्या विचारात असणाऱ्या युन्हा किम यांनी जेव्हा त्यांच्या व्यवसायाची सुरूवात केली तेव्हा 100 तास काम करत होत्या. त्यामुळे त्यांना झोप मिळणं कठीण होतं. स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी त्यांनी मेडिटेशन करण्याचा निर्णय घेतला. मेडिटेशनमुळे त्यांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले त्यांनी पाहिले. आपल्याला जो अनुभव आला तो प्रत्येकाला मिळावा यासाठी त्यांनी मेडिटेशन अॅप विकसित केलं. व्यस्त जीवनशैली असणाऱ्या लोकांना एका मिनिटाच्या आत रिलॅक्स होता यावं, यापद्धतीने या अॅपची आखणी केली. 
 

Web Title: Meet the Women Behind the Apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.