'हा' मराठी माणूस आहे त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचा शिल्पकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2018 03:36 PM2018-03-03T15:36:21+5:302018-03-03T16:54:45+5:30

त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते.

'This' Marathi man is the architect of BJP's victory in Tripura | 'हा' मराठी माणूस आहे त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचा शिल्पकार

'हा' मराठी माणूस आहे त्रिपुरामधील भाजपाच्या विजयाचा शिल्पकार

Next
ठळक मुद्देत्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

नवी दिल्ली - त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. गेल्या 25 वर्षांपासूनची डाव्यांची या राज्यातील सत्ता उलथवून टाकणे एक मोठे आव्हान होते. माणिक सरकार गेली सलग २० वर्षे मुख्यमंत्री पदावर होते त्यांच्या स्वच्छ आणि पारदर्शक कामाच्या पार्श्वभूमीवर विजय मिळवणे अत्यंत कठीण काम होते. पण डाव्यांची या राज्यातील मक्तेदारी मोडून काढणे भाजपाला शक्य झाले ते संघटनात्मक शक्तीच्या बळावर. 

त्रिपुरामधील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुनील देवधर हे नाव समोर आले आहे. सुनील देवधर यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाला त्रिपुराचा गड काबीज करता आला. मूळचे मुंबईकर असलेले सुनील देवधर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत तयार झाले आहेत. गत विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यामुळे संपूर्ण राज्य जिंकण्यासाठी भाजपाला शुन्यातून सुरुवात करायची होती. 

दोन वर्षांपूर्वी सुनील देवधर यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून त्यांनी या राज्यात तळ ठोकला व राजकीय समीकरणाची जुळवाजुळव सुरु केली. त्रिपुरा जिंकणे हा मोदी सरकारसाठी फक्त ऐतिहासिक विजय नाहीय तर भाजपाला यानिमित्ताने सुनील देवधर यांच्या रुपाने परिस गवसला आहे. 

जाणून घेऊया कोण आहेत सुनील देवधर 
- 52 वर्षांचे सुनील देवधर आरएसएसच्या तालमीत तयार झाले असून त्रिपुराच्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांना राज्याचे प्रभारी बनवण्यात आले. 

- 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात सुनील देवधर यांच्यावर प्रचार व्यवस्थापकाची जबाबदारी होती. 

- नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुनील देवधर त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रणनितीकार म्हणून काम करत होते. 

- देवधर यांनी मेघालयमध्ये आरएसएस प्रचारक म्हणूनही काम केले आहे. 

- 2013 साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीत काम करताना देवधर यांच्या रणनितीमुळे भाजपाला 10 पैकी सात जागा जिंकता आल्या होत्या. 

- त्रिपुराच्या प्रभारीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी मोदी दूत योजना नावाचे एक अभियान सुरु केले. या अभियानातंर्गत त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची स्थानिक भाषेत माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली.                         

- आदिवासी बहुल भागातील  मते भाजपाकडे वळवण्यासाठी देवधर यांनी  जानेवारी महिन्यात आयपीएफटीसोबत आघाडी केली. 

- आपण मुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही हे सुनील देवधर यांनी जाहीर केले आहे.    

                                


 

Web Title: 'This' Marathi man is the architect of BJP's victory in Tripura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.