बडोद्यात घुमला मराठीचा जागर; साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या, ग्रंथदिंडीत हजारो नागरिकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:47 AM2018-02-16T03:47:50+5:302018-02-16T03:48:04+5:30

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजून सहभाग घेतला होता.

Marathi jagger of Marathi in Baroda; Thousands of citizens participated in literature, tribunal | बडोद्यात घुमला मराठीचा जागर; साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या, ग्रंथदिंडीत हजारो नागरिकांचा सहभाग

बडोद्यात घुमला मराठीचा जागर; साहित्य संमेलनाची पूर्वसंध्या, ग्रंथदिंडीत हजारो नागरिकांचा सहभाग

Next

- स्नेहा मोरे

बडोदा साहित्यनगरी : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी सायंकाळी येथील लक्ष्मीविलास महाल प्रवेशद्वार येथून ग्रंथदिंडीला आरंभ झाला. या ग्रंथदिंडीला तीन वर्षांच्या लहानगयापासून ते साठीच्या आजीआजोबांनी आर्वजून
सहभाग घेतला होता. एरव्ही केवळ गुजराती भाषेचे बोल
ऐकू येणाºया बडोद्यात या ग्रंथ दिडींचा श्रीगणेशा मात्र ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम...च्या’ गजराने झाला.
ग्रंथदिडीची धुरा नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
यांनी सांभाळली. स्वागताध्यक्ष
श्रीमंत राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे डॉ. श्रीपाद जोशी, मराठी वाड्मय परिषद बडोदेचे दिलीप खोपकर आदी सहभागी झाले होते.
बडोदे येथे स्थायिक असलेल्या मराठी बांधवांनी या ग्रंथदिंडीसाठी उत्साहात तयारी केल्याचे
दिसून आले. दुपारपासून ढोलताशा पथक, लेझीम पथक, वारकरी समुदाय, किर्तनकार आणि
काही सामाजिक संस्थांच्या सदस्यांचा जल्लोष कानी येत होता. पारंपरिक वेष, नाकात नऊवारी आणि डोक्यावर फेटा परिधान करुन सर्वच
जण साहित्यरंगी रंगले. ग्रंथ
दिंडीत शाळकरी विद्यार्थी- विद्याथीर्नींनी छत्रपती शिवाजी महाराज, नामदेव, झाशीची
राणी, भारतमाता, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे पोशाख धारण केले होते. तर
काही लहानग्यांनी चालत्या ट्रकमध्ये मल्लखांब आणि दोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांचे
लक्ष वेधले.

मराठी वाचा, मराठी वाचवा
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, अशा संदेशाचे फलक हाती घेऊन ‘मराठी वाचा , मराठी वाचवा’ असा संदेश शाळकरी मुलांनी दिला.

अन् फुगडीचा मोह आवरलाच नाही... संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. अबालवृद्धांचा उत्साह पाहून त्यांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. ग्रंथदिंडीतील ज्येष्ठांच्या चमूत सहभागी होऊन त्यांनीही फुगडीचा फेर धरला.

या संमेलनाच्या निमित्ताने ८३ वषार्नंतर मराठी बांधवांनी बडोदे गाठले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ज्या भूमीतून मराठी भाषेचे वैभव जाणले आज त्याच पुण्यनगरीत हा साहित्य मेळा होतोय,याचा विशेष आनंद आहे. त्यामुळे हे संमेलन निश्चितच यशस्वी होईल. -राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, स्वागताध्यक्ष

Web Title: Marathi jagger of Marathi in Baroda; Thousands of citizens participated in literature, tribunal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.