पुन्हा कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी दिले राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:00 PM2019-05-30T16:00:55+5:302019-05-30T16:07:55+5:30

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेले अनपेक्षित अपयशामुळे कॉंग्रेसमध्ये सद्या नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

manipur Congress 12 MLA resign | पुन्हा कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी दिले राजीनामे

पुन्हा कॉंग्रेसच्या 12 आमदारांनी दिले राजीनामे

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमध्ये जणुं राजीनाम्याची लाटच आली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीपासून तर प्रदेश अध्यक्ष आणि आमदार यांनी राजीनामे देणे सुरु केले आहे. त्यातच आता, मणिपूर येथील 12 आमदारांनी राजीनामे दिले असल्याचे समोर आले आहे . राहुल गांधींनी राजीनामा दिल्याने आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचा खुलासा या आमदारांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेले अनपेक्षित अपयशामुळे कॉंग्रेसमध्ये सद्या नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. दिल्ली पासून गल्लीपर्यंत राजीनामाचा धडका सुरु आहे. यात काहीजण पराभवाची जवाबदारी स्वीकारुन राजीनामे देत आहे तर काही जण पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. त्यातच आता, मणिपूर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे मणिपूर मधील 12 आमदारांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीची जवाबदारी घेत राहुल यांनी ज्याप्रमाणे आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे , त्याचप्रमाणे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आम्ही सुद्धा राजीनामा देत असल्याचा खुलासा या आमदारांनी केला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी किंवा कॉंग्रेस यावर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरेल.


 


 

 

 

 

Web Title: manipur Congress 12 MLA resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.