मणिशंकर अय्यर यांच्यावर काही तासातच माफी मागण्याची नामुष्की, नरेंद्र मोदींचा 'नीच' म्हणून केला होता उल्लेख

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 5:59pm

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका मणिशंकर अय्यर यांनी केली होती. आपल्या या वक्तव्यावरुन माघार घेत त्यांना माफी मागावी लागली आहे.

नवी दिल्ली -  काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली आहे. नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका मणिशंकर अय्यर यांनी केली होती. आपल्या या वक्तव्यावरुन माघार घेत त्यांना माफी मागावी लागली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही त्यांच्या भाषेचं असमर्थन करत माफी मागण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. 'नीच म्हणजे खालच्या स्तराचा असं मला म्हणायचं होतं. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने मी हिंदी बोलताना इंग्लिशचाच विचार करुन बोलतो. जर माझ्या वक्तव्याचा काही दुसरा अर्थ निघाला असेल तर मी माफी मागतो', असं मणिशंकर अय्यर बोलले आहेत. 

'बाबासाहेब आंबेडकरांच्या सेंटरचं उद्घाटन करताना नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर टीका करण्याची काय गरज होती ? दरदिवशी नरेंद्र मोदी आमच्या नेत्यांविरोधात असभ्य भाषा वापरत आहेत. मी फ्रिलान्स काँग्रेस नेता आहे. माझ्याकडे कोणतंही पद नाही. त्यामुळे मी मोदींना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ शकतो', असं मणिशंकर अय्यर म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'नीच म्हणजे खालच्या स्तराचा असं मला म्हणायचं होतं. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने मी हिंदी बोलताना इंग्लिशचाच विचार करुन बोलतो. जर माझ्या वक्तव्याचा काही दुसरा अर्थ निघाला असेल तर मी माफी मागतो'. 

मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना 'चायवाला' म्हटलं होतं. मात्र आपण कधीच मोदींना चहावाला म्हटलं नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तुम्ही इंटरनेटवर जाऊन व्हिडीओ चेक करु शकता असं त्यांनी सांगितलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला होता. काँग्रेसच्या एका कुटुंबाला वाढवण्यासाठी बाबसाहेब आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. 'आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरलाल नेहरु. अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्धाटनावेळी. मला वाटतं हा माणूस एकदम नीच आहे. त्याच्यात कोणती सभ्यता नाही. अशावेळी इतक्या घाणेरड्या राजकारणाची काय गरज'.

 

मणिशंकर अय्यर यांच्या टिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलं आहे. 'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'. गुजरातची जनता भाजपाला मतं देऊन आपलं उत्तर देईल असा दावा मोदींनी केला आहे. काँग्रेसने गुजरातच्या मुलासाठी 'नीच' शब्दाचा वापर केला असल्याचं मोदी म्हणाले आहेत. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या त्या वक्तव्याचाही उल्लेख केला, ज्यामध्ये त्यांना 'मौत का सौदागर' संबोधण्यात आलं होतं. मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या टीकेला उत्तर न देण्याचं आवाहन भाजपा नेत्यांना केलं आहे.   

राष्ट्रीय कडून आणखी

लष्करी जवानाला १४ दिवसांची कोठडी
आणखी दलित भाजपा खासदार पक्षनेतृत्वावर नाराज
३० लाख लोकांचे भवितव्य अनिश्चित
मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?
निकालाआधीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग; गेहलोत फेव्हरिट, पायलटही दावेदार

आणखी वाचा