बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 05:02 PM2017-08-17T17:02:31+5:302017-08-17T17:09:37+5:30

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे.

 Mamtaatcha number 1 in Bengal | बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज

बंगालमध्ये ममताच नंबर 1, पण भविष्यात भाजपाचे चॅलेंज

Next

कोलकाता, दि. 17 - पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. सर्वच्या सर्व सात महापालिकांमध्ये तृणमुलने काँग्रेसने विजय मिळवला आहे. भाजपा या निवडणुकीत दुस-या स्थानावर असून, डावे थेट तिस-या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तीन महापालिकांमध्ये भाजपाने सहा जागा जिंकल्या आहेत. 

उत्तर बंगालमधील धुपगुरी येथे चार, बुनियादपूर आणि पानस्कुरामध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. तृणमुलने बर्दवान जिल्ह्यातील दुर्गापूर महापालिकेत सर्वच्या सर्व 43 वॉर्डमध्ये विजय मिळवला. हलदीया महापालिकेत तृणमुलने सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. महापालिका क्षेत्रात भाजपाला मिळालेले यश हे आगामी काळात तृणमुलसमोर भाजपाचे आव्हान उभे राहणार असल्याचे संकेत आहेत असे निवडणूक विश्लेषकांनी सांगितले. 

आणखी वाचा 
दिल्लीला जात नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
सैन्य मागे घेतले तरी भारताला सोडणार नाही - चीन

या निवडणुकीत काँग्रेसला एक जागाही जिंकता आली नाही. हल्दीया महापालिका डाव्यांचा गड होता. पण तृणमुलने इथे सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या. धुपगुरीमध्ये तृणमुलने 12 तर, भाजपाने चार जागा जिंकल्या. या निवडणुकीत तृणमुलची मते कमी न होता उलटी वाढली आहेत.  डाव्यांचा जो जनाधार होता तो भाजपाकडे झुकतोय हे या निवडणूकीतून दिसले असे तृणमुलचे नेते गौतम देब यांनी सांगितले. तृणमुलने ही निवडणूक जिंकण्यासाठी धन आणि मसल पावरचा उपयोग केला असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. 

निवडणुकीच्या या निकालातून भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये जनाधार तयार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कट्टर विरोधक आहेत.  त्यांनी अऩेक मुद्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. 

नोटाबंदी निर्णयामुळे देश जाणार १०० वर्ष मागे - ममता बॅनर्जी
 नोटाबंदीमुळे जी परिस्थिती आहे तशी परिस्थिती आणीबाणीच्यावेळीही नव्हती. ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय देशाला १०० वर्ष मागे घेऊन जाणारा आहे अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर प्रहार केला होता. 
 

दिल्लीच्या आजादपूरमध्ये त्यांनी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त जनसभा घेत या निर्णयाचा निषेध केला. यावेळी ममता बॅनर्जींनी पंतप्रधानांवर व्यक्तीगत टीकाही केली. मोदीजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उद्या गुप्त मतदान घेतले तर, तुम्हाला तुमचा स्वत:चा पक्ष आणि  कुटुंबियही मतदान करणार नाहीत असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 
 

Web Title:  Mamtaatcha number 1 in Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.