खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 05:49 PM2019-04-08T17:49:49+5:302019-04-08T17:50:40+5:30

भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे.

Mamta Banerjee criticized PM Narendra Modi | खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

खोटे बोलणाऱ्या मोदींचे तोंड सर्जिकल टेप लावून बंद केले पाहिजे, ममता बॅनर्जींची टीका

Next

नागराकाटा (पश्चिम बंगाल) - गेल्या काही वर्षांमध्ये बंगालच्या राजकारणात एकछत्री अंमल प्रस्थापित करणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर यावेळी भाजपाने जोरदार आव्हान उभे केले आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सातत्याने शाब्दीक चकमकी उडत आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ''मोदींना सत्ता आणि राजकारणातून दूर केले पाहिजे. तसेच त्यांचे तोंड चिटकणाऱ्या सर्जिकल टेपने बंद करून टाकले पाहिजे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

 ''पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी साडे चार वर्षे नरेंद्र मोदी जगभ्रमंतीच करण्यात गुंतले होते. त्यामुळे शेतकरी आणि मध्यमवर्गाच्या समस्यांकडे लक्ष देण्यासांनी मोदींना वेळ मिळाला नाही. आता निवडणुका जवळ आल्याने मोदी प्रत्येकाला घाबरवत आहेत, धमकावत आहेत, खोटे बोलत आहेत. जर खोटं बोलण्याची स्पर्धा आयोजित केली गेली, त्यात नरेंद्र मोदींना पहिले बक्षीस मिळेल, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला. 

 ''मोदींना खोटे बोलता येऊ नये म्हणून यावेळच्या निवडणुकीत जनता नरेंद्र मोदींच्या ओठांना ल्युकोप्लास्ट लावून ते चिकटून टाकतील. देशहिताच्या दृष्टीने मोदींना केवळ पंतप्रधानपदच नव्हे तर राजकारणातूनही बाहेर करणे आवश्यक आहे.'' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. तसेच मोदींनी मला धमक्या देऊ नयेत, तसे करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरेल, अशा इशाराही त्यांनी दिला.  

''मोदींनी पाच वर्षांच्या कार्यकाळातील साडे चार वर्षए जग फिरण्यात घालवली. जेव्हा देशात शेतकरी आत्महत्या करत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा नोटामंदीमुळे लोक मरत होते तेव्हा मोदी काय करत होते. जेव्हा कोट्यवधी लोक आपल्या नोकऱ्या गमवत होते. तेव्हा मोदी काय करत होते, अशा सवालांच्या फैरी ममता बॅनर्जी यांनी मोदींवर झाडल्या.  

Web Title: Mamta Banerjee criticized PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.