कोसळत्या तंबूतही मोदींना दिसला ममतांच्या सत्तेचा अस्त!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:33 AM2018-07-17T03:33:45+5:302018-07-17T03:34:01+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी सकाळी येथे झालेल्या ‘कृषी कल्याण सभे’त श्रोत्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून उभारलेला एक तंबू कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ९० जण जखमी झाले.

Mamata's power is visible in Modi's collapsing tent! | कोसळत्या तंबूतही मोदींना दिसला ममतांच्या सत्तेचा अस्त!

कोसळत्या तंबूतही मोदींना दिसला ममतांच्या सत्तेचा अस्त!

Next

मिदनापूर (प. बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी सकाळी येथे झालेल्या ‘कृषी कल्याण सभे’त श्रोत्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून उभारलेला एक तंबू कोसळून झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ९० जण जखमी झाले. यापैकी डोक्याला जबर मार लागलेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
वास्तविक हा अपघात होता. पण मोदींनी त्याचेही राजकारण केले. सभेतील गडबड गोंधळ थोडा शमल्यावर मोदी म्हणाले, आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही. सभेला आलेल्यांपैकी एक तृतियांश लोक कोसळलेल्या तंबूखाली दबले जाऊनही इतर श्रोत्यांनी न घाबरता शांतपणे बसून राहावे, याची कल्पनाही करता येत नाही.
अशा संकटकाळीही लोकांनी दाखविलेले धैर्य हे प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सत्तेचा अस्त जवळ आल्याचे द्योतक असल्याचे सूचवत मोदी म्हणाले, या घटनेवरून लोकांची शिस्त व शक्ती दिसून येते. नैसर्गिक आपत्तीतही न डगमगणारे हे लोक ममतांच्या धाकदपटशालाही भीक घालणार नाहीत.
मोदींची घोषणाबाजी
मोदींचे भाषण सुरू असतानाच हा अपघात घडला. मोदींनी तंबूतील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. इतर लोकांनीही घाबरून जाऊन धावाधाव करून नये यासाठी मोदींनी दोन-चार घोषणा द्यायला लावून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले, तसेच सुरक्षेसाठी मागे उभ्या असलेल्या एसपीजी कमांडोंनाही मोदींनी कोसळलेल्या तंबूकडे जाण्याच्या सूचना केल्या. 
>..अन् लोखंडी पाइपचा सांगाडा अचानक कोसळला
गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने मिदनापूर कॉलेजिएट मैदानावर सभेला येणाऱ्या लोकांना आडोसा मिळावा, यासाठी लोखंडी पाइपांच्या सांगाड्यावर छत म्हणून ताडपत्रीवजा कापड ताणून बांधून तंबू उभारण्यात आले होते. यापैकी एका तंबूत श्रोत्यांची खूप गर्दी झाली. काही उत्साही श्रोते समोरचे चांगले दिसावे यासाठी तंबूच्या लोखंडी सांगाड्यावर चढले. त्यातच जोरदार पाऊस आणि वारा आला आणि हा तंबू कोसळला.हे सर्व अचानक घडल्याने तंबूखाली दबले गेलेले श्रोते बाहेर पडण्यासाठी उठून धावू लागले. त्यातून नंतर चेंगराचेंगरी झाली. ९० हून अधिक लोक जखमी झाले. त्यात बहुतांश महिला होत्या. अनेक जण घुसमटून बेशुद्ध झाले.
>ममतांचे टिष्ट्वट
ममता बॅनर्जी यांनी लगेच टिष्ट्वट करून या घटनेतील जखमींना लवकर बरे वाटावे अशी कामना केली आणि राज्य सरकार त्यांच्यावर संपूर्ण उपचार करेल, असे सांगितले.
>विचारपूर करण्यासाठी इस्पितळात गेलेल्या मोदींनी जखमी तरुणीला स्वाक्षरी देऊन तिची इच्छा लगेच पूर्ण केली. हा फोटो नंतर व्हायरल झाला.

Web Title: Mamata's power is visible in Modi's collapsing tent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.