ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 03:08 PM2019-06-13T15:08:09+5:302019-06-13T15:08:27+5:30

"एका पोलिसाचा ड्युटीवर असताना मृत्यू होतो. मात्र, पोलीस संपावर जात नाहीत"

mamata banerjee threatens action against kolkata doctors says its bjp conspiracy | ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

Next

पश्चिम बंगाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संपावर गेलेल्या डॉक्टरांना चार तासांचा अल्टीमेटम दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना चार तासांत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राज्य सरकारच्या एसएसकेएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी शिकाऊ डॉक्टरांना कामावर येण्यास सांगितले. डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर घोषणाबाजी केली.

यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, "जे डॉक्टर कामावर परतणार नाही, त्यांनी रुग्णालय सोडावे. ते बाहेरचे आहेत. सरकार त्यांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करणार नाही. मी अशा डॉक्टरांचा निषेध करते की, जे संपावर गेले आहेत. एका पोलिसाचा ड्युटीवर असताना मृत्यू होतो. मात्र, पोलीस संपावर जात नाहीत."

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टारांचा वाद चिघळला आहे. येथील ज्युनिअर डॉक्टर आंदोलन करत आहेत. तर त्यांना समर्थन देण्यासाठी सीनिअर डॉक्टर समोर आले आहेत. यामुळे बुधवारी बंगालमधील आरोग्य सेवा ठप्प झाली होती. मंगळवारी ज्युनिअर डॉक्टरांनी आंदोलन सुरु केले. त्यावेळी एका शिकाऊ डॉक्टरासोबत कोलकातामधील रुग्णालयात मारहाण झाल्याचे समोर आले. रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे शिकाऊ डॉक्टराला मारहाण करण्यात आली होती.

या घटनेमुळे बुधवारी सरकारी रुग्णालयातील ओपीडी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आपत्कालीन विभाग सुरु ठेवण्यात आला होता. पण, डॉक्टरांची अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवेवर परिणा झाला होता. सरकारी रुग्णालयांशिवाय खासगी रुग्णालयांतील सेवेवर परिणाम झाला होता, कारण काही खासगी रुग्णालयांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला होता.

दरम्यान, एनआरएसच्या रुग्णालयाच्या एका ज्युनिअर डॉक्टरला सोमवारी मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला. त्यांना त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोलकात्यातील रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांनी काम बंद केले आणि सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. यावेळी डॉक्टरांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केला की डॉक्टराला मारहण झाल्यानंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. याशिवाय, राज्य सरकारने डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन मंगळवारी दिल्यानंतरही आंदोलन सुरुच ठेवले होते.  
 

Web Title: mamata banerjee threatens action against kolkata doctors says its bjp conspiracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.