मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:34 AM2018-05-27T01:34:32+5:302018-05-27T01:46:14+5:30

मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे.

Major Gogoi News | मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

मी स्वत:च मेजर गोगोई यांच्यासह हॉटेलात गेले, तरुणीने दिला जबाब

Next

श्रीनगर - मेजय लितुल गोगोई ज्या तरुणीसह एका हॉटेलात गेल्याने वाद निर्माण झाला होता, त्या तरुणीने ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत आणि मी स्वत:च्या इच्छेनेचे त्यांच्यासह हॉटेलात गेले होते, असा जबाब जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे. आम्हाला काही वेळ एकत्र घालवायचा होता. त्यामुळे ती त्यांच्यासमवेत हॉटेलात गेले, असे तिचे म्हणणे आहे.
या तरुणीने गोगोई यांना क्लीन चीट दिली असली तरी त्या दोघांचे नेमके काय संबंध आहेत, याची चौकशी लष्करामार्फत होणार आहे. लष्करी अधिका-यांनी स्थानिक लोकांशी एका मर्यादेपेक्षा अधिक संबंध ठेवू नयेत, असा लष्कराचा संकेत आहे. तो त्यांनी मोडला का, हेही आता तपासले जाईल.
तरुणीने जबाबात सांगितले की, आपण मेजर गोगोई यांना फेसबुकवर भेटलो. तेव्हा आदिल अदनान नावाने त्यांचे फेक अकाउंट होते. पण आदिल अदनान म्हणजे मेजर गोगोई आहेत, हे लक्षात आले. नंतर मेजर गोगोई यांनी स्वत:ची खरी ओळख मला सांगितली, गोगोई याच्यासह येणारा समीर अहमद यालाही मी ओळखते.
मी एका बचत गटात काम करते, मी १0 वीपर्यंत शिकले आहे व स्वत:च्या मर्जीने त्यांच्यासह हॉटेलात गेले होते. त्यांना भेटण्यास माझी आई विरोध करीत असे. त्यामुळे आम्ही अनेकदा बाहेर भेटलो आहोत, असेही तरुणीने जबाबात नमूद केले आहे.(वृत्तसंस्था)

कोणाला सांगू नका
गोगोई दोनदा रात्री घरी आले होते, त्यांना पाहून मी घाबरले होते, पण हे कोणाला कळता कामा नये, असे त्यांनी सांगितल्याने मी गप्प राहिले, असे आईने आधीच सांगितले आहे.

Web Title: Major Gogoi News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.