मध्यप्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाला दिली 'काटें की टक्कर' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 07:38 AM2018-01-21T07:38:07+5:302018-01-21T07:39:58+5:30

मध्येप्रदेशमध्ये काल नगरपालिका निवडणूकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाशासित मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसनं टफफाईट दिली.

Madhya Pradesh Local Body Elections: BJP, Congress win equal number of president’s posts | मध्यप्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाला दिली 'काटें की टक्कर' 

मध्यप्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाला दिली 'काटें की टक्कर' 

Next

भोपाळ : मध्येप्रदेशमध्ये काल नगरपालिका निवडणूकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाशासित मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसनं टफफाईट दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 9-9 नगरपालिकांमध्ये विजय मिळवत आपला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान केला. तर एका नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. 

गतवर्षी मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस फक्त दोन महानगरपालिकामध्ये सत्तेत होती. या निवडणुकीत काँग्रेसनं सात नगरपालिका भाजपकडून हिस्कावून घेण्यात यश मिळालं आहे. यावर मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजय सिंह म्हणाले की, राज्यातील जनता भाजपवर नाराज असल्याचं, या निवडणूक निकालातून सिद्ध होतं. सरकारी यंत्रणा आणि पैशांचा वापर करुनही, या निवडणुकीत भाजपच्या हाती अपयश आलं.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचे खापर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंदसौरचे भाजपचे बंडखोर उमेदवारावर फोडलं आहे. मंदसौरमधील भाजपच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काल जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने पीथमपूर आणि डही, कुक्षी, धामनोद, पानसेमल, राजपूर, पलसूद आणि ओंकारेश्वर नगरपालिकांमध्ये झेंडा रोवला. तर सेंधवा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने, तिथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या राघोगढ नगरपालिकेसह बडवानी, मनावर आणि धार नगरपालिकेत विजय मिळवला. याशिवाय, अंजड, खेतिया, सरदारपूर, राजगढ आणि धरमपूरीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. तर जैतहारी नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. 

Web Title: Madhya Pradesh Local Body Elections: BJP, Congress win equal number of president’s posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.