मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 03:13 PM2018-12-13T15:13:52+5:302018-12-13T15:15:12+5:30

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल : मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण काही जागांवर किरकोळ फरकानं भाजपाला पराभव पत्करावा लागला.

madhya pradesh assembly election nota congress bjp polls | मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

मध्य प्रदेशात काँग्रेसमुळे नाही तर NOTAमुळे भाजपाचा पराभव

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनंतर भाजपानं राज्य गमावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला. 15 वर्षांनंतर भाजपाला जनतेनं नाकारलं, असा दावा काँग्रेसचे नेतेमंडळी करत आहेत. पण काही जागांवर किरकोळ फरकानं भाजपाला पराभव पत्करावा लागला. जर भाजपाकडून बूथ व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केले गेले असते तर आजचे चित्र कदाचित काहीसे वेगळे असते. काही जागांवर तर नोटामुळे भाजपाच्या मतांमध्ये घट झाल्याचे झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या जागांवर काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र या विजयामधील अंतरापेक्षा जास्त मतं नोटाला मिळाली आहेत. 

मध्य प्रदेशात बसपाला 2, एसपीला 1 आणि अपक्षांचा 4 जागांवर विजय झाला. मध्य प्रदेशात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी 116चा आकडा गाठणं आवश्यक आहे. सपा आणि बसपानं काँग्रेसला पाठिंबा दर्शवण्याची घोषणा केली आहे. जादुई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसला आणखी दोन जागांची गरज आहे. दरम्यान, या निकालाचं चित्र बदलण्यासाठी 'नोटा'नंही महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. मध्य प्रदेशात कमीत कमी 11 जागांवर नोटामुळे भाजपाचा खेळ पुरत बिघडला आहे.  

जाणून घेऊया 11 जागांची स्थिती

1. दमोह
काँग्रेसच्या राहुल सिंह यांचा 78,199 मतांनी विजय झाला. तर भाजपाचे जयंत मलैया येथे दुसऱ्या स्थानावर होते. या विजयामधील अंतर केवळ 798 मतांचं होते आणि येथे 1,299 मतं नोटाला मिळाली.

2. गुन्नौर
काँग्रेसचे शिवदयाल बागारी 57,658 मतांसहीत येथे आमदार म्हणून निवडून आले आहेत.  तर 55,674 मतांसहीत भाजपाचे राजेश वर्मा दुसऱ्या क्रमांक होते. येथेही लोकांनी नोटावर विश्वास दाखवला. येथे नोटाला 1,984 मतं मिळाली. 

3. राजपूर
काँग्रेस उमेदवार - बाला बच्चन  - 85,513 मतं.

बाला बच्चन यांनी भाजपाचे उमदेवार अंतरसिंह देवीसिंह पटेल यांना 932 मतांच्या फरकानं हरवलं. नोटाला 2485 मतं मिळाली.

4.  राजनगर
राजनगरमध्येही नोटाचा करिश्मा दिसून आला. येथे काँग्रेसचे विक्रम सिंह आमदार म्हणून निवडून आलेत. सिंह यांना 40,362 मतं मिळालीयेत, तर भाजपाच्या एरविंद पटेरिया यांना  39,630 मतं मिळाली. तर 2,485 जणांनी नोटाचा स्वीकार केला. 


5. नेपानगर
काँग्रेसच्या उमेदवार सुमित्रा देवी कासडेकर यांचा 85,320 मतांनी विजय झाला, तर भाजपाच्या मंजू राजेंद्र दादू यांना 84,056 एवढी मतं मिळाली. सुमित्रा आणि मंजूमध्ये 1,264 मतांचं अंतर आहे तर नोटाला 2,551 जणांनी मतं दिली आहेत. 

6. सुवासरा
मध्य प्रदेशातील सुवासरा जागेवर काँग्रेसचे डांग हरदीप सिंह यांना 93,169 मतं मिळाली. त्यांनी भाजपाचे राधेश्याम नंदलाल पाटीदार यांचा 350 मतांनी पराभव केला. 
नोटा - 2,976 मतं

7. मांधाता
काँग्रेसचे नारायण पटेल 71,228 मतं मिळाली. त्यांनी भाजपाच्या नरेंद्र सिंह तोमर यांचा 1,236 मतांच्या फरकानं पराभव केला. 

नोटा - 1,575 मतं

8. जोबट
काँग्रेसच्या कलावती भूरिया - 46,067 मतं
भाजपाच्या माधोसिंह डाबर - 44,022 मतं 
दोघांच्या मतांमध्ये 2,056 आकड्याचा फरक
नोटा - 5139 मतं




9.  ब्यावरा
काँग्रेसचे गोवर्धन सिंह यांनी भाजपाच्या नारायण सिंह पवार यांना 826 मतांनी हरवले. तर 1481 जणांनी नोटाचा पर्याय स्वीकार केला.  

10. ग्वालियर(एस)
काँग्रेसचे प्रवीण पाठक यांनी भाजपाच्या नारायण सिंह कुशवाहा यांना 121 मतांनी हरवलं.
1550 लोकांना नोटाला आपलं मत दिले. 

11.  जबलपूर(एन)
काँग्रेसच्या विनय सक्केना यांनी भाजपाच्या शरद जैन यांना 578 मतांनी हरवलं. तर 1209 मतदारांना नोटाचा पर्याय निवडला. 

Web Title: madhya pradesh assembly election nota congress bjp polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.