Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 07:57 PM2018-10-23T19:57:51+5:302018-10-23T19:59:15+5:30

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Madhya Pradesh Assembly Election 2018 : BJP uses magic to attract voters in Madhya Pradesh | Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

Madhya Pradesh Assembly Election 2018 : मध्य प्रदेशमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपा करणार जादूचे प्रयोग 

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढला आहे. सत्ताधारी भाजपानेही राज्यातील आपली 15 वर्षांपासूनची सत्ता टिकवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे काँग्रेसकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे भाजपा अडचणीत आहे, अशा परिस्थितीत भाजपाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी छक्कल लढवली आहे. आता मध्य प्रदेशमध्ये पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपाचे नेते जादुगारांची मदत घेणार आहेत. हे जादुगार ग्रामीण भागात जादूचे प्रयोग दाखवतील. तसेच सरकारने गेल्या 15 वर्षांत केलेल्या कामांची माहिती देतील.

 जादूच्या प्रयोगांमधून प्रभावी प्रचार करण्यासाठी भाजपाने पूर्ण रणनीती आखली आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने राबवलेल्या संबल योजना आणि लाडली लक्ष्मी योजना यासारख्या लोकप्रिय योजनांच्या व्यापक प्रचाराच्या दृष्टीने खेळ तयार करण्यास सांगितले आहे. त्याबरोबरच पक्षाकडून लोकनृत्य, नुक्कड, नाटक यांचीही मदत मतदारांनी आकर्षिक करण्यासाठी घेण्यात येणार आहे.    

भाजपाचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी सांगितले की, "उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाच्या प्रचार सुरुवात होईल. त्यानंतर जादुगार, नाटके, छोट्या छोट्या कलांच्या माध्यमातून आम्ही पक्षाच्या कामांचा प्रचार करणार आहोत. त्यासाठी सहा जादुगारांची मदत घेणार आहोत. जादुगारांचा प्रत्येक कार्यक्रम अर्ध्या तासाचा असेल. तसेच या माध्यमातून 151 मतदारसंघामध्ये प्रचार केला जाईल." 

 दरम्यान, भाजपाच्या या जादूच्या प्रयोगांमुळे काँग्रेसच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी सांगितले की, राज्यातील भाजपा सरकार 15 वर्षांपासून भ्रम पसरवून लोकांना फसवत आहे. पण आता कुठलाही भ्रम चालणार नाही. मामाजी आम्हाला मामू बनवण्याचे बंद करा, असे जनता सांगत आहे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी राज्यातील भ्रष्ट सरकारची अखेर होणार आहे."

Web Title: Madhya Pradesh Assembly Election 2018 : BJP uses magic to attract voters in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.