एलपीजी कर्ज वसुलीला स्थगिती, तेल कंपन्यांकडून तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:26 AM2018-03-25T00:26:17+5:302018-03-25T00:26:17+5:30

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसजोडणी घेताना गॅस शेगडी व सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीला सरकारी तेल कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. काही राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

LPG loan restraint, adjournment from oil companies immediately | एलपीजी कर्ज वसुलीला स्थगिती, तेल कंपन्यांकडून तूर्त स्थगिती

एलपीजी कर्ज वसुलीला स्थगिती, तेल कंपन्यांकडून तूर्त स्थगिती

Next

नवी दिल्ली : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसजोडणी घेताना गॅस शेगडी व सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीला सरकारी तेल कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. काही राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
जून २0१५ पासून देशातील ३.६ कोटी गरीब महिलांना मोफत गॅसजोडणी देण्यात आली आहे. यातील एलपीजी जोडणीचा १,६00 रुपयांचा खर्च सरकारने उचलला आहे. गॅस शेगडी व सिलिंडरचा खर्च ग्राहकांनी करायचा होता. हे पैसेही भरू न शकणाऱ्यांना कंपन्यांनी शेगडी व सिलिंडरसाठी बिनव्याजी कर्ज दिले होते. या कर्जाची वसुली आता थांबविण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १ एप्रिलपासून पुढे ६ गॅस सिलिंडर पूर्ण होईपर्यंत कर्जवसुली थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जवसुली थांबविण्याचे कारण निवेदनात दिलेले नाही. योजनेचे लाभार्थी मोफत गॅसजोडणी मिळाल्यानंतर गॅस भरून घेत नाहीत, असे आढळले आहे. कर्ज दिले
नसते, तर ही योजना अपयशी ठरली असती.

Web Title: LPG loan restraint, adjournment from oil companies immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.