भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 08:05 PM2019-07-23T20:05:55+5:302019-07-23T20:09:13+5:30

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल.

Lotus will open in Karnataka, soon Yeddyurappa will be CM next. karnataka vidhan sabha | भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार

भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार

Next

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. आज दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर 15 आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 20 महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल. 

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार असल्याने बहुमतासाठी 113 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने 95 आणि विरोधात 105 मतदान झालं आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे. 

यापुढे काय होईल ?
बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे कुमारस्वामी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देतील. 
भाजपाकडे बहुमत असल्याने भाजपा नेते येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाऊ शकते. त्यानंतर, बहुमत सिद्ध केल्यास भाजप सत्तेवर येऊ शकते. 
राज्यपाल बजुभाई वाला यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. वजुभाई वाला हे येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊ शकतात. त्यानंतर भाजपाला बहुमत सिद्ध करावे लागेल. 
कर्नाटकतील राजकीय नाट्यावेळी राजीनामा दिलेल्या आमदारांचा कदाचित नवीन मंत्रिमंडळात शपथविधी होऊ शकतो. 
काँग्रेसच्या बाजुने 99 मते पडली तर विरोधात 105 मते होती. भाजपाचे विधानसभेतील बलाबल 105 असल्याने ही मते विरोधात पडली. कर्नाटकमध्ये प्रत्यक्ष आमदार मोजून बहुमत चाचणी घेण्यात आली. बहुमताचा मॅजिक आकडा गाठण्यात जेडीएसला अपयश आले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाटक संपुष्टात आलं आहे. काँग्रेसकडून डी.के. शिवकुमार यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, हे सर्वच प्रयत्न अयशस्वी झाले. 

कर्नाटकमधील आजचे मतदान

भाजपाच्या बाजुने -  105 भाजपा

सरकारच्या बाजुने -  

68 काँग्रेस
34 जेडीएस
02 अपक्ष
01 बसप



 

Web Title: Lotus will open in Karnataka, soon Yeddyurappa will be CM next. karnataka vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.