फसवलं ! 'त्या' तरुणीने प्लास्टिक सर्जरी केलेलीच नाही, मनोरंजनासाठी केला होता टाईमपास

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 7:26pm

काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी ५० हून अधिक सर्जरी केलेल्या 19 वर्षीय तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अँजेलिना जोलीसारखं दिसण्याचा नादात तरुणीचा चेहरा विद्रूप झाल्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु होती.

तेहरान - काही दिवसांपासून हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी ५० हून अधिक सर्जरी केलेल्या 19 वर्षीय तरुणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अँजेलिना जोलीसारखं दिसण्याचा नादात तरुणीचा चेहरा विद्रूप झाल्याने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु होती. प्लास्टिक सर्जरी फसल्याने चर्चेत आलेल्या या तरुणीने सर्जरी केलीच नसल्याचं समोर आहे. तरुणीने स्वत: आपले खरे फोटो पोस्ट करत आपण मनोरंजनासाठी हा टाईमपास केल्याचं सांगितलं आहे. 

सहार तबारने स्थानिक वृत्तवाहितीनीला दिलेल्या माहितीनुसार, आपण मेक-अप आणि फोटोशॉपचा वापर करत हे फोटो तयार केले होते. स्वत:चं मनोरंजन करण्याच्या हेतूने आपण हे फोटो पोस्ट केल्याचा दावा सहार तबारने केला आहे. सहार तबारने आपल्या सर्जरीनंतरचे फोटो पोस्ट केल्यानंतर तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स चांगलेच वाढले होते. हे आपलं एकाप्रकारे स्वत:ला व्यक्त करायचं माध्यम होतं असं सहार तबारने सांगितलं आहे. 

'मी जेव्हा फोटो पोस्ट केला तेव्हा त्याला अधिक हास्यास्पद आणि मजेदार करण्याच्या दृष्टीने मी तो एडिट केला. हे स्वत:ला व्यक्त करण्याचं माध्यम असून, हे एक आर्ट आहे', असं सहार तबार म्हणाली आहे. आपल्या इन्साग्राम फॉलोअर्सना आपला खरा चेहरा माहिती असल्याचंही तिने सांगितलं आहे. दरम्यान सहार तबारचे खरे फोटो सध्या व्हायरल होऊ लागलेत. या फोटोंमध्ये सहार तबारचं खरं रुप दिसत असून, तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.   

राष्ट्रीय कडून आणखी

Amritsar Train Accident VIDEO : अमृतसर येथील रेल्वे अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ 
Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये 'असा' घडला भीषण अपघात
'आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांच्यावर २६ ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाई करू नका!'
काश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
Sabarimala Temple : डाव्यांनी बाबरी मशिद प्रकरणाशी केली तुलना, काँग्रेसचीही वादात उडी

आणखी वाचा