लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 02:20 AM2017-08-28T02:20:46+5:302017-08-28T02:22:23+5:30

देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे.

Lok Sabha, Vidhan Sabha elections simultaneously? | लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी?, नीति आयोगाने दर्शविली अनुकूलता

Next

नवी दिल्ली : देशाच्या हितासाठी २०२४ पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी दोन टप्प्यांत घेण्यास नीति आयोग अनुकूल आहे. देशातील सगळ््या निवडणुका या प्रशासनाला कमीत कमी व्यत्यय आणताना निर्भय वातावरणात झाल्या पाहिजेत, असे नीति आयोगाने नुकत्याच प्रसिद्धीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे. 2024 पासून आम्ही लोकसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत एकाच वेळी घेण्यासाठीचे काम सुरू करू शकतो, त्यासाठी काही राज्यांच्या विधानसभांचा कालावधी किमान एका वेळेस तरी कमी करावा लागेल किंवा वाढवाला लागेल. याची अंमलबजावणी देशाच्या हितासाठी करताना, या निवडणुकीशी संबंधित घटक घटनात्मक आणि निवडणुकांचे तज्ज्ञ, वैचारिक संस्था, सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ््या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हा अहवाल म्हणतो. यात सुयोग्य घटनात्मक आणि वैधानिक दुरुस्त्यांचा आराखडा करणे, एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी व्यवहार्य चौकट तयार करणे, संबंधित घटकांशी संवादाची योजना आणि अंमलबजावणीचे वेगवेगळे तपशील असले पाहिजेत, असे ‘थ्री ईअर अ‍ॅक्शन अजेंडा, २०१७-१८ ते २०१९-२०’ या अहवालात म्हटले आहे.
या कामासाठी शिफारशींचा विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला मध्यस्थ संस्था करण्यात आले असून, मार्च, २०१८ ही मुदत ठरविण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर भर दिल्यामुळे नीति आयोगाच्या या शिफारशीला खूप महत्त्व आहे. मुखर्जी यांनी या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमातील भाषणात एकाच वेळी निवडणुका घेण्यास अनुकूलता दाखविली होती. ते म्हणाले होते की, ‘निवडणूक सुधारणांवर विधायक चर्चा करण्यास अनुकूल वेळ आलेली आहे.’

Web Title: Lok Sabha, Vidhan Sabha elections simultaneously?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.