काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:30 PM2019-03-12T17:30:03+5:302019-03-12T18:55:24+5:30

देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले

Lok sabha elections 2019 - We will reform GST, Says Rahul Gandhi | काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

काँग्रेस सरकार आल्यास जीएसटीची पुनर्रचना करणार - राहुल गांधी 

Next

गांधीनगर -  देशात आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जर काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर व्यापाऱ्यांसाठी त्रासदायक होत असलेल्या जीएसटीत पुनर्रचना करुन दिलासा देणार असल्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथील गांधीनगर येथे केले. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

यावेळी बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटी देशात लागू करताना सांगितलं होतं देशात एक करप्रणाली असेल ती सुलभ असेल. पण गब्बर सिंह टॅक्स आजपर्यंत छोट्या व्यापाऱ्यांना समजला गेला. जीएसटी करप्रणालीचा फटका अनेक छोट्या व्यापारांना बसला, अनेक व्यापारी बेरोजगार झाले त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर सर्वप्रथम जीएसटी करप्रणाली पुनर्रचना करुन व्यापारांना दिलासा देऊ असं त्यांनी सांगितले. 



 

राहुल गांधी यांनी गांधीनगरच्या सभेत बोलताना राफेल, जीएसटी, नोटाबंदी अशा अनेक मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर निशाना साधला. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक छोटे व्यापारी देशोधडीला लागले. नोटाबंदीच्या रांगेत सामान्य माणूस उभा होता. या रांगेत अंबानी उभे होते का ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राफेलवरुन मोदींना लक्ष्य करत राफेलच्या माध्यमातून हवाई दलाचे 30 हजार कोटी अनिल अंबानी यांच्या खिशात घातले गेले असा आरोप राहुल गांधी यांनी पुन्हा केला. याच राफेल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय संचालकांना एका रात्रीत हटवलं गेले असंही ते म्हणाले.



 

महात्मा गांधी यांचे विचार भारत देशाची ओळख आहे. एकीकडे महात्मा गांधी यांनी देश घडविण्यासाठी आपले प्राण दिले तर दुसरीकडे देश तोडण्याचे काम भाजपवाले करत आहेत. लोकांना न्याय मिळाला नाही तर लोक कोर्टात जातात. मात्र कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आम्हाला काम करु दिलं जातं नाही असा आरोप केला.  

नरेंद्र मोदी यांनी मोठ्या उद्योजकांचे साडे तीन लाख कोटीचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांसाठी एक पैसाही दिला नाही असा आरोपही राहुल गांधी यांनी गुजरात येथील आपल्या भाषणात केला.  

 

Web Title: Lok sabha elections 2019 - We will reform GST, Says Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.