पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 04:08 PM2019-03-16T16:08:43+5:302019-03-16T16:17:00+5:30

उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला.

Lok Sabha elections 2019: Rahul Gandhi says Congress will combine all GST slabs into one | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी माफी मागतो - राहुल गांधी

डेहराडून : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये आयोजित जनसभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल डील, जीएसटी आणि किसान सन्मान योजनेवरुन हल्लाबोल केला. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. जीएसटीच्या या मोठ्या चुकीमुळे नरेंद्र मोदी यांच्यातर्फे मी आपली माफी मागतो, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

जीएसटीच्या मुद्द्यावरुन व्यापारांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, 'आम्ही गब्बर सिंह टॅक्सला खऱ्या जीएसटीमध्ये बदल करु. ज्यामध्ये एक साधारण टॅक्स असेल. सीएसटीमुळे आपले नुकसान झाले आणि त्यासाठी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मी माफी मागतो. त्यांनी मोठी चूक केली आहे, ती आम्ही दुरुस्त करु.' 


याचबरोबर, किसान सन्मान योजनेवरुन राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. संसदेत शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून प्रतिदिन साडे तीन रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भाजपा खासदारांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून टाळ्या वाजवल्या, असे सांगत राहुल गांधी यांनी 'एका चोराला तुम्ही तीस हजार कोटी रुपये देता. मात्र, देशातील शेतकऱ्यांसाठी तुम्ही दिवसाला साडे तीन रुपये देता आणि मूर्ख बनवण्यासाठी टाळ्या वाजवता.' अशा शब्दांत हल्लाबोल केला.    






 

Web Title: Lok Sabha elections 2019: Rahul Gandhi says Congress will combine all GST slabs into one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.