'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 12:19 PM2019-03-14T12:19:50+5:302019-03-14T12:23:03+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

lok sabha elections 2019 mamta banerjee told pm modi if you have a courage then fight in west bengal | 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवावी'

Next
ठळक मुद्दे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही लगावला आहे. 

नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 'हिंमत असेल तर नरेंद्र मोदींनीपश्चिम बंगालमधून 2019 ची निवडणूक लढवावी' असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. तसेच मोदींनी हा निर्णय घेतला तर नोटाबंदीप्रमाणे त्यांचे हे पाऊल अपयशी ठरेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

'कोणीही कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मी पण वाराणसी मतदारसंघातून लढू शकते. पण जर मोदी बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था नोटाबंदीसारखी होईल. जनतेच्या न्यायालयात त्यांना दंडित केले जाईल' असे ममता बॅनर्जी यांनी मोदींविषयी प्रश्न विचारल्यावर म्हटलं आहे.

'मला माहीत आहे की, त्यांनी देशाचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना लोकांना उत्तर द्यावे लागेल. त्यांनी पश्चिम बंगालमधून निवडणूक लढल्यास आम्हाला खूप आनंद होईल. जर त्यांना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर त्यांनी सर्वच 42 जागांवरुन निवडणूक लढवावी' असं ही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 'बंगालचे मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी येथून निवडणूक लढवावी. त्यांनी येताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल यासारख्या आपल्या राजकीय सेनांनाही येथे आणावे. त्यांनी येथे येऊन भोजन आणि संस्कृतीचा आनंद घ्यावा. जनता त्यांना निरोप देईन' असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

'आणखी एका सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडणूक लांबवली' 

ममता बॅनर्जी यांनी बंगालला त्रास देण्यासाठी आणखी एका हल्ल्याचा कट भाजपाने आखला असून त्यासाठीच येथील निवडणुका लांबवल्या जात असल्याचं दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. तसेच 'कृपया माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडू नका कारण, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थेचा मी सन्मान करते. मात्र, पश्चिम बंगालमध्ये वातावरण बिघडवण्याचा भाजपाचा डाव आहे' असे ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. ममता बॅनर्जी यांनी 'मी माझ्या राज्यातील लोकांना जाणते, त्यांच्याप्रती माझ्या मनात खूपच आदर आहे. मात्र, भाजपा त्यांचा अनादर करते. त्यांनी माझ्या आणि बंगालच्याविरोधात कट रचला आहे. मात्र, हा कट त्यांच्यावरच उलटणार असल्याचं म्हटलं होतं. 

'तृणमूलच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपा ट्रेन भरुन पैसे आणतेय'

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना खरेदी करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी केला होता. तृणमूलच्या नेत्यांनी पक्ष सोडावा, भाजपात सामील व्हावं, यासाठी पैशांच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यासाठी राज्याबाहेरुन पैसा आणला जात आहे, असा सनसनाटी आरोप बॅनर्जींनी केला होता. भाजपाकडून तृणमूलच्या नेत्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावादेखील त्यांनी केला होता. 

Web Title: lok sabha elections 2019 mamta banerjee told pm modi if you have a courage then fight in west bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.