Lok Sabha Election: राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:30 AM2019-04-04T11:30:46+5:302019-04-04T16:43:36+5:30

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक ...

Lok Sabha Election: राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी | Lok Sabha Election: राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी

Lok Sabha Election: राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत. राहुल गांधी आज वायनाड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उपस्थित होत्या. तसेच, वायनाडमध्ये काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले होते. भाजपा सरकारच्या काळात दक्षिण भारतातील सांस्कृतिक ठेव्यावर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत काँग्रेसने उत्तर आणि दक्षिण भारताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाते आहे. ते नाते दृढ करण्यासाठी राहुल गांधी दक्षिण भारतातून लढणार असल्याचे सांगितले आहे. 

LIVE

Get Latest Updates

02:48 PM



 

01:33 PM

भारत देश एकसंध आहे, हा संदेश देण्यासाठी वायनाडमध्ये आलो आहे - राहुल गांधी



 

01:33 PM

रोड शोमध्ये ट्रकचा रॉड तुटून पडल्याने तीन पत्रकार जखमी



 

01:27 PM



 

01:25 PM

राहुल गांधींच्या रोड शोदरम्यान गोंधळ

वायनाडमध्ये राहुल गांधींच्या सुरु असलेल्या रोड शोदरम्यान गोंधळ झाल्याचे समजते. यावेळी बॅरिकेट तुटल्यामुळे काही पत्रकार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  



 

01:15 PM

प्रियंका गांधी उद्या गाझियाबादमध्ये

प्रियंका गांधी यांचा उद्या गाझियाबादमध्ये रोड शो होणार आहे.



 

12:38 PM

वायनाडमध्ये 'रोड शो'ला सुरुवात

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधील रोड शोला सुरुवात झाली आहे.



 

11:57 AM

वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या समर्थकांची गर्दी, थोड्याच वेळात होणार रॅलीला सुरुवात

11:46 AM

 राहुल गांधीच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते दाखल होत आहेत


 

11:46 AM

राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल; थोड्याच वेळात रोड शो




 

 

 

11:31 AM

राहुल गांधी वायनाडमध्ये दाखल; थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार



 

Web Title: Lok Sabha Election: राहुल गांधींच्या 'रोड शो'दरम्यान गोंधळ; तीन पत्रकार जखमी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.