प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 10:12 AM2019-05-15T10:12:10+5:302019-05-15T10:12:22+5:30

भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह नेहमीच म्हणतात, निवडणुकी मॅनेजमेंटने जिंकल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रज्ञा सिंह आणि आम्ही येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असंही गुप्ता म्हणाले.

Lok Sabha Election 2019 Pragya Singh Thakur was admitted to the Strangroom in the middle of the night | प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

प्रज्ञा सिंह ठाकूर मध्यरात्री अचानक स्ट्राँगरूममध्ये दाखल

googlenewsNext

भोपाळ - भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ येथील लोकसभेच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मध्यरात्री अचानक जेल गाठले. भोपाळमधील जुन्या जेलमध्ये ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम तयार करण्यात आली आहे. प्रज्ञा सुमारे ४० मिनिटांपर्यंत स्ट्राँगरूममध्ये होत्या. स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमची पाहणी करण्यासाठी प्रज्ञा आल्या होत्या. 

यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ४० मिनिटे परिसराची पाहणी केली. तसेच येथील सीसीटीव्ही आणि ईव्हीएमला असलेले सील व्यवस्थित आहेत का, याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील मंत्री उमाशंकर गुप्ता देखील उपस्थित होते. यावेळी प्रज्ञा सिंह ठाकूर बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याऐवजी गुप्त माध्यमांशी बोलत होते.

लोकशाहीत जनतेने दिलेली मते ईव्हीएममध्ये कैद झाली आहेत. ईव्हीएम येथे सुरक्षित आहेत. मात्र जनतेची मतदानरुपी संपत्ती सुरक्षीत आहे का, हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. भोपाळमधील काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह नेहमीच म्हणतात, निवडणुकी मॅनेजमेंटने जिंकल्या जातात. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रज्ञा सिंह आणि आम्ही येथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असंही गुप्ता म्हणाले.

यावेळी प्रज्ञा सिंह यांनी देखील ईव्हीएमच्या सुरक्षेवर संतुष्ट नसल्याचे म्हटले. तसेच या संदर्भात आपण लेखी तक्रार देणार असल्याचे प्रज्ञा सिंह यांनी इशारा करून सांगितले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Pragya Singh Thakur was admitted to the Strangroom in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.