'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 09:53 AM2019-05-22T09:53:33+5:302019-05-22T10:21:37+5:30

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल.

Lok Sabha Election 2019 opposition parties angry over exit polls congress still have hope | 'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यामुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक जरी संभ्रमात असले तरी काँग्रेसला मात्र २००४ लोकसभा निवडणूक निकालाच्या पुनरावृत्तीची आशा आहे. २००४ मध्ये काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. आता एक्झिट पोल आल्यानंतर देखील काँग्रेसनुसार भाजप २०० च्या आतच राहिल. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपला एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात येत असलेल्या जागा मिळणे कठिण आहे. तसेच ज्या राज्यात २०१४ मध्ये भाजप आघाडीवर होते, तिथे भाजपला नुकसान होणे निश्चित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा करण्यात आलेला दावा काँग्रेसनेच नव्हे तर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने देखील फेटाळला आहे. सपाचे महासचिव रामगोपाल यादव म्हणाले की, २३ मे रोजी सर्व एक्झिट पोल कोसळणार आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या सतीश चंद मिश्रा यांनी एक्झिट पोलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आपला एक्झिट दाखवून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नायडू यांच्यानुसार काँग्रेसला १२९ आणि भाजपला १७९ जागा मिळतील.

Web Title: Lok Sabha Election 2019 opposition parties angry over exit polls congress still have hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.