'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:30 PM2019-05-11T12:30:06+5:302019-05-11T12:32:00+5:30

मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला.

Lok Sabha Election 2019 navjot singh sidhu slams pm modi compares him with new bride | 'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

'मोदींचं काम नव्या नवरीसारखं; काम कमी अन् …'

Next

इंदोर - माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे. सिद्धू यांनी मोदींची तुलना नव्या नवरीशी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी अनेक नेत्यांचा टीका करताना तोल सुटत असल्याचे चित्र आहे. त्यात आता सिद्धू यांनी मोदींची तुलना नव्या नवरीशी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आपल्या खास शैलीतील भाषणांसाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धू यांनी मोदींच्या कामकाजावर टीका केली. इंदोर येथील सभेत सिद्धू म्हणाले की, मोदींचं काम नव्या नवरीप्रमाणे आहे. नवी नवरी ज्याप्रमाणे पोळ्या कमी लाटते अन् आपल्या बांगड्यांचा आवाजच अधिक करते. त्यामुळे शेजारच्यांना वाटते, नवरी फार कामाची आहे. मोदी सरकारचं देखील असंच असून काम कमी आणि कामाचा आव आणला जातो, अशी टीका सिद्धू यांनी केली.

यावेळी सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटं बोलण्याचा आरोप केला. मोदी केवळ खोट बोलतात. खोट बोलण्यात त्यांना भाजपचे इतर मंत्री देखील साथ देतात. आपण आतापर्यंत 'हिरो नंबर वन, कुली नंबर वन, कुली नंबर वन', हे चित्रपट पाहिले आहेत. परंतु, सध्या 'फेकू नंबर वन' पाहायला मिळत असल्याचा टोला सिद्धू यांनी लगावला. तसेच 'ना राम मिला ना रोजगार, हर गली मे मोबाईल चलानेवाला बेरोजगार मिला', अशी खोचक टीका सिद्धू यांनी मोदींवर केली.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 navjot singh sidhu slams pm modi compares him with new bride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.